हा लेख इंग्रजीत वाचण्यासाठी इथे क्लिक करा: Alice in Wonderland Syndrome
ह्या लेखामध्ये मी तुम्हाला माझ्या दोन रुग्णांच्या कथा सांगणार आहे. ही मेडिकल कंडिशन अॅलिस इन वंडरलँड सिंड्रोम नावाने ओळखली जाते. मला खात्री आहे की तुम्ही हे नाव यापूर्वी कधीही ऐकलेले नाही. ही कंडीशन दुर्मिळ असून रंजक आहे. ही कंडिशन समजून घेण्यासाठी अॅलिस इन वंडरलँड नावाच्या पुस्तकाबद्दल मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. या पुस्तकावरून मेडिकल कंडिशनला हे फॅन्सी नाव कसे दिल्या गेले हे एकदा तुम्हाला कळले की माझ्या रुग्णांच्या कथा समजण्यासाठी सोपे होईल. पहिल्या उताऱ्यात ह्या पुस्तकाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. नंतरच्या उताऱ्यात हे नाव वैद्यकीय क्षेत्रात कशा पद्धतीने वापरले गेले ते सांगणार आहे.
अॅलिस इन वंडरलँड ही 1865 मध्ये लुईस कॅरोल यांनी लिहिलेली मुलांची इंग्रजी कादंबरी आहे. या पुस्तकात बऱ्याच गमती जमती लिहिल्या आहेत. अॅलिस नावाची एक मुलगी सशाचा पाठलाग करत करत एका बिळात जाते आणि तिथून ती एका जादुई नगरीत शिरते. तिथे तिला बरेच चित्र विचित्र प्राणी भेटतात. सगळे प्राणी त्यांच्या मूळ आकारापेक्षा खूप लहान किंवा खूप मोठे असून चक्क माणसांसारखे वागत असतात. पुढे कथेत असेही दाखवले आहे की तिला एक बाटली सापडते ज्यावर ड्रिंक मी असे लिहिलेले असते. ते प्यायल्यानंतर ती 10 इंचाची होऊन जाते. त्यानंतर तिला एक केक सापडतो. त्यावर इट मी असे लिहिलेले असते. ते खाल्ल्यानंतर इतकी मोठी होते की ती जवळ जवळ छताला स्पर्श करते. ह्या जादुई नगरीत तिला वेगवेगळे अनुभव येतात, जसे कि शरीराचा आकार खूप कमी किंवा खूप मोठा किंवा बेढब होणे किंवा आऊट ऑफ बॉडी अनुभव इत्यादी. हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झाले. ह्या पुस्तकावर आधारित लहान मुलांसाठी टेलिव्हिजन शो आणि ॲनिमेटेड चित्रपट पण तयार झाले आणि ते सुद्धा अतिशय लोकप्रिय झाले.
1955 मध्ये डॉ. जॉन टॉड नावाच्या एका ब्रिटिश मानसोपचारतज्ञाच्या निदर्शनास आले की, त्यांच्या अनेक गंभीर डोकेदुखी असणाऱ्या रुग्णांना डोकेदुखी सोबत चित्र विचित्र अनुभव येत आहेत ज्यामध्ये त्यांना वस्तू खूप लहान, खूप मोठ्या किंवा बेढब दिसत आहेत. त्यांनी मग अॅलिस इन वंडरलँडचे लेखक, कॅरोलच्या डायरीचा शोध घेऊन त्याचा अभ्यास केला. डायरीतल्या नोंदीवरून असा अंदाज लावला गेला की बहुतेक त्या लेखकाला मायग्रेनचा त्रास होता आणि त्याबरोबरच त्यांना चित्र विचित्र अनुभव यायचे. स्वतःच्या अनुभवावरून कदाचित त्यांनी अॅलिस नावाचे एक पात्र उभे केले आणि रंजक पद्धतीने अॅलिस इन वंडरलँड नावाचे पुस्तक लिहिले. पुढे चालून अशा मेडिकल कंडिशनला अॅलिस इन वंडरलँड सिंड्रोम (AIWS) म्हणू लागले.अॅलिस इन वंडरलँड सिंड्रोमचा अनुभव बऱ्याच कंडिशन्स मध्ये होतो त्यापैकी आहेत: मायग्रेन, काही ठराविक औषधे, काही ड्रग्स, ब्रेन ट्यूमर, मशरूम पॉयझनिंग, मेंदूचे इन्फेक्शन, मेंदूला आघात होणे आणि एपिलेप्सी (अपस्मार). रुग्णांना असे चित्र विचित्र अनुभव का येतात? 👆 वरील चित्रात दाखवल्या नुसार मेंदूच्या काही भागात ॲबनॉर्मल सिग्नल्स किंवा ॲबनॉर्मल रक्त प्रवाहामुळे व्यक्तीला असे अनुभव येतात. लक्षात घ्या कि हे हलुसीनेशन/Hallucination (आभास, म्हणजे अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा आभास) किंवा इल्युजन/Illusion (भ्रम, म्हणजे दोरीला साप समजणे) पेक्षा वेगळे असते. ह्याला व्हिजुअल डिस्टोर्शन म्हणतात ज्यामध्ये व्यक्ती किंवा वस्तू विकृत किंवा बेढब भासतात. व्हिजुअल डिस्टोर्शनचा आपल्याला काहीही धोका नसतो.
मला आशा आहे की आता तुम्हाला ह्या मेडिकल कंडिशन बद्दल पुरेशी माहिती मिळालेली आहे. चला तर मग माझ्या दोन पेशंटच्या कथा ऐकूया. ह्या दोन कथा थोड्या सारख्या तर थोड्या वेगळ्या आहेत. म्हणूनच मी ह्या दोन कथा निवडल्या आहेत.
कुणालची स्टोरी:
कुणाल हा एक सात वर्षाचा पेशंट होता. काही महिन्यांपासून त्याला डोकेदुखीचा त्रास होत होता. त्याच्या पेडियाट्रिशियनने तिच्या परीने ट्रीटमेंट देऊन पाहिली. पण त्याचा उपयोग झाला नाही. म्हणून त्यांनी त्याला न्यूरॉलॉजिस्ट कडे म्हणजे माझ्याकडे रेफर केले. तो त्याच्या आई-वडील आणि तीन वर्षाच्या भावासोबत माझ्या क्लिनिकमध्ये आला. मी त्याच्या आई-वडिलांना बरेच प्रश्न विचारून त्याच्या डोकेदुखी बद्दल सविस्तर माहिती काढत होते. ही माहिती काढत असताना एक गमतीशीर गोष्ट माझ्या निदर्शनास आली. प्रत्येक वेळी डोकेदुखीच्या आधी तो त्याच्या आईला विचारायचा की, मम्मी तू एवढी लहान (त्याच्या तीन वर्षाच्या भावा एवढी) का दिसतेस? असे म्हणून काही मिनिटातच डोकेदुखीची तक्रार करायचा. त्याचा प्रश्न आई नेहमी हसण्यावारी न्यायची. मी पटकन हेरले की कुणालला तर मायग्रेन सोबत अॅलिस इन वंडरलँड सिंड्रोम होतोय. मेंदूच्या एका विशिष्ट भागात ॲबनॉर्मल सिग्नल मुळे त्याला त्याची आई थोड्या वेळासाठी आकाराने लहान म्हणजे त्याच्या तीन वर्षाच्या भावा एवढी भासायची. मी त्याला मायग्रेनची ट्रीटमेंट सुरू केली आणि काही महिन्यातच तो पूर्णपणे रिकव्हर झाला.
जॉर्डनची स्टोरी:
जॉर्डन हा माझा सहा वर्षाचा पेशंट. माझ्याकडे त्याची अटेन्शन डेफिसिट हैपरेक्टिविटी डिसॉर्डर (ADHD)ची ट्रीटमेंट सुरू होती. एके दिवशी मला त्याच्या आईचा फोन आला. त्या खूप काळजीत होत्या. त्यांनी मला सांगितले की, तो रात्री झोपेतून उठून स्वतःच्या दोन्ही हाताकडे पाहून खूप रडत आहे. माझ्या हातांना काय झाले? ते एवढे छोटे का झाले? कशामुळे श्रिंक झाले? असे म्हणत जीवाच्या आकांताने रडून थकून पुन्हा झोपत आहे. त्याला त्याच्या हातांचा आकार लहान झाल्याचा भास होत होता, पण प्रत्यक्षात तसे काहीही झालेले नव्हते. आईने कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही तो ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता. सुरुवातीला आईला वाटले कि त्याला कदाचित काहीतरी स्वप्न पडले असेल. पण असे एक नव्हे दोन नव्हे तर सतत तीन रात्री घडले आणि आईला खूप काळजी वाटायला लागली. मी त्यांना विचारले की, जॉर्डनला ताप वगैरे आलेला आहे का, डोक्याला मार लागला आहे का, किंवा त्याने कोणते औषधे घेतले आहे का? त्यावर त्या म्हणाल्या की सर्दी-खोकला झाल्यामुळे त्याला कफ सिरप देत आहे. मी मनात म्हटले कि सापडला चोर ! कफ सिरप मध्ये डेक्सट्रोमेथॉर्फान (Dextromethorphan) नावाचा एक घटक असतो ज्यामुळे काही जणांना अॅलिस इन वंडरलँड सिंड्रोम होऊ शकतो. मी त्यांना सगळी परिस्थिती व्यवस्थित समजावून सांगितली. तसेच ताबडतोब कफ सिरप द्यायचे बंद करा आणि दोन दिवसांनी मला क्लिनिक मध्ये येऊन भेटा असे सांगितले. दोन दिवसांनी त्या जॉर्डनला घेऊन माझ्या क्लीनिकमध्ये आल्या. त्यांनी सांगितले कि कफ सिरप बंद केल्यानंतर त्याला तसा अनुभव येणे बंद झाले आहे.
घाबरू नका! कफ सिरप घेतल्याने सगळ्यांनाच हा सिंड्रोम होत नाही. झाला तरीही त्यापासून काही नुकसान नाही.
कशा वाटल्या तुम्हाला अॅलिस इन वंडरलँड सिंड्रोमच्या जगावेगळ्या कथा? 🤩
Atisundar savi,tuzi likhanachi padhat ekdam chan ahe
Interesting
Thank you, Sushma and Anita!
nice pts.story history bn their tt l given by you is very great….dognosis is perfect…grt..savi
Thank you!
Dr. Savita … Hi.
Started omega to my twins .. As I m thinking that both are not focusing on Study .. ADHD… ?
How many days ..i should give them Omega … As I found to be effective and works properly…
Dr. Durgadas Pande
9823191218
You can continue giving them omega 3 fish oil for few years. No harm.