हा लेख इंग्रजीतून वाचण्यासाठी इथे क्लिक करा: Super Brain Yoga
योगा हा आपल्याला मिळालेला एक उत्कृष्ट वारसा आहे. भारतीय योग गुरुंनी पाश्चिमात्य जगाला योगाचा परिचय दिला. व्यायाम म्हणून योगा हा एक शारीरिक व्यायाम आहे ज्यामध्ये प्रामुख्याने आसनांचा समावेश असतो (योगा पोझेस). तसेच प्राणायामामुळे श्वासोच्छवासाचे व्यायाम घडतात आणि मेडिटेशन मूळे मानसिक आरोग्य सुधारते. हे शरीर आणि मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. हा लेख सुपर ब्रेन योगाबद्दल आहे.
मानवी मेंदूत अंदाजे शंभर अब्ज न्यूरॉन्स असतात. हे न्यूरॉन्स कोट्यावधी कनेक्शनद्वारे जोडलेले असतात. मेंदूची साईझ महत्वाची नसून कनेक्शन्सची संख्या महत्वाची असते. कनेक्शनची संख्या जास्त असेल तर मेंदू अधिक कार्यक्षम असतो. मेंदूचे दोन भाग, म्हणजे डावा अर्धगोल आणि उजवा अर्धगोल ज्याला हेमीस्पीयर्स असे म्हणतात. ह्या दोन्ही हेमीस्पीयर्सचे कार्य वेगवेगळे असते. डावा भाग शरीराच्या उजव्या भागाचे आणि उजवा भाग शरीराच्या डाव्या भागाचे नियंत्रण करते. आपण जेव्हा एकदम स्ट्रेस फ्री असतो किंवा योग-मेडिटेशन करतो तेव्हा उजव्या आणि डाव्या मेंदूचे सिंक्रोनाइझेशन होते आणि ते एकत्रित काम करू लागतात. त्यामुळे मेंदूची शक्ती वाढू शकते, अधिक माहिती टिकवून ठेवण्यास आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
गणपती बाप्पा समोर “उठा-बश्या” काढण्याची जुनी पारंपरिक पद्धत आपल्याला माहीतच आहे. तसेच शिक्षा म्हणून ही उठा-बश्या काढायची पद्धत भारतीय शाळांमध्ये वापरली जात असे. आपल्या पूर्वजांनी एका विशिष्ट उद्देश्यानेच ह्या पद्धतीचा अवलंब केलेला असावा. त्याचे आता सुपर ब्रेन योगा असे नामकरण झाले.
वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये हे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते:
- उठक-बैठक (हिंदी)
- गुंजेलु (तेलगू)
- थोपुकरणम (तामिळ)
- बास्की (कन्नड)
कालांतराने फिलीपिन्सस्थित इनर स्टडीज, इनकॉर्पोरेटेड (आयआयएसआय) चे संस्थापक ग्रँड मास्टर चोआ कोक सुई यांनी संशोधन केले आणि या सुपर ब्रेन योगाची आधुनिक आवृत्ती विकसित केली. सोशल मीडिया मूळे “सुपर ब्रेन योगा” हा शब्द लोकप्रिय झाला आणि लोकांचे लक्ष वेधून घेतले.
सुपर ब्रेन योगामुळे ब्रेन वेव्ह्ज म्हणजे मेंदूच्या विद्युत लहरीत काय बदल होतात हे जाणून घेण्याआधी ब्रेन वेव्ह्ज काय आणि कोणत्या प्रकारचे असतात ते पाहू या.
ब्रेन वेव्ह्ज म्हणजे मेंदूच्या विद्युत लहरी: ह्यासाठी “इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम किंवा ईईजी” नावाची टेस्ट करतात. ब्रेन वेव्ह्ज ४ प्रकारचे असतात.
- अल्फा वेव्ह्ज: म्हणजे आपले डोके एकदम शांत आणि स्ट्रेस फ्री आहे असे दर्शवते.
- बीटा वेव्ह्ज: आपले रोजचे काम म्हणजे बोलणे, काम करणे, छोट्या-मोठ्या समस्या सोडवणे असे करताना बीटा वेव्ह्ज तयार होतात.
- थिटा वेव्ह्ज: खोल विश्रांती, चिंतन दरम्यान थिटा वेव्ह्ज दिसतात.
- डेल्टा वेव्ह्ज: डेल्टा हे सर्वात स्लो वेव्ह्ज असतात आणि ते गाढ झोपेत आणि खूप खोल ध्यान अवस्थेत दिसतात.
ब्रेन हे अल्फा स्टेट मध्ये असताना सर्वात सर्जनशील आणि प्रेरणादायक कार्य करते.
काही संशोधनात असे दिसून आले आहे कि, सुपर ब्रेन योग केल्यावर अल्फा वेव्ह्ज वाढतात. म्हणूनच, जे लोक नियमितपणे सुपर ब्रेन योग करतात, त्यांना अल्फा स्टेटचा फायदा होतो आणि त्यामुळे मेमरी, क्रिएटिव्हिटी वाढते.
सुपर ब्रेन योगामध्ये प्राणायाम आणि अक्युप्रेशरचा वापर केला आहे. कानांच्या पाळीत ऍक्युप्रेशर पॉईंट असतात असे मानले जाते. त्यामुळे ब्रेनचा उजवा आणि डावा भाग “कनेक्ट” होतात. हे करायला एकदम सोपे आहे. दररोज काही मिनिटे लागतात. दिवसाच्या कोणत्याही वेळी आपण सुपर ब्रेन योगाचा अभ्यास करू शकता, पण शक्यतो सकाळी करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला त्याचा परिणाम दिवसभर जाणवेल. नियमितपणे केल्यास त्याचा फायदा दिसून येईल. माझ्या काही अमेरिकन पेशंटनी सांगितले कि त्यांच्या शाळेत नियमितपणे सुपर ब्रेन योग करायला लावतात. हे ऐकून मला थोडे आश्चर्य आणि कौतुक वाटले.
सुपर ब्रेन योगा करण्याची पद्धत:
- १. सरळ उभे रहा.
- २. डाव्या हाताने उजव्या कानाच्या पाळीला चिमटीत धरा. अंगठा समोर आणि बोट मागे असावे.
- ३. तश्याच पद्धतीने उजव्या हाताने डाव्या कानाला चिमटीत धरा.
- ४. खोलवर श्वास घ्या आणि पाय दुमडून अर्धवट बसलेल्या स्थितीत जा आणि या स्थितीत २- 3 सेकंद रहा.
- ५. श्वास सोडत सरळ उभे राहा. हे झाले एक पूर्ण चक्र.
- ६. दररोज कमीत कमी १५ वेळा या चक्रची पुनरावृत्ती करू शकता.
सुपर ब्रेन योगाचे फायदे:
- मेंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजूचे सिंक्रोनाइझेशन करते
- मन शांत होते
- विचार क्षमता वाढते
- मानसिक उर्जा वाढते
- आपल्याला अधिक सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह बनवते
- लक्ष केंद्रित करणे आणि एकाग्रता सुधारणे
- ताणतणाव म्हणजे स्ट्रेस कमी करते
- मुलांमध्ये बिहेवियरल म्हणजे वर्तणुकीच्या समस्या कमी करते
- स्मरणशक्ती सुधारते
अल्झाइमर, औदासिन्य (डिप्रेशन), अटेन्शन डेफिसिट अँड हायपरॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी), डाउन सिंड्रोम, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आणि डिस्लेक्सिया यासारख्या रुग्णां मध्ये सुपर ब्रेन योगाचा चांगला परिणाम आढळून आला आहे.
जरी सुपर ब्रेन योगा जुन्या काळापासून प्रचलित असले तरीही त्यावर पुरेसे संशोधन झालेले नाही. एप्रिल २०१४ च्या “इंटर नॅशनल जर्नल ऑफ योगा” मध्ये वैज्ञानिक पुरावा दिला आहे. लॉस एंजेलिसचे डॉ. एरिक रॉबिन्स यांनी एका न्यूज प्रोग्रामला सांगितले की, त्याच्या एका विद्यार्थ्याचा ग्रेड एका सेमेस्टरमध्ये सी पासून ए पर्यंत वाढला. डॉ. यूजीनियस वांग जूनियर म्हणतात की ब्रेन इमेजिंगने मेंदूच्या उजव्या आणि डाव्या भागांचे सिन्क्रोनायझेशन सिद्ध झाले आहे. सुपर ब्रेन योगाबद्दल लोकांची वेगवेगळी मते आहेत. काही लोकांना हे प्लासिबो इफेक्ट वाटते, खोटे वाटते. खरे पाहता हा एक शारीरिक व्यायाम आणि प्राणायाम आहे. जर देवावरच्या श्रद्धेने केल्यास त्याचा शारीरिक आणि मानसिक फायदा होणारच ना! मला वाटते कि, करायला काय हरकत आहे? त्यात नुकसान काहीच नाही.
टेक होम मेसेज:
- तुमच्या मनाला पटत असेल तर सुपर ब्रेन योगा करण्यास प्रारंभ करा.
- हे करायला एकदम सोपे आहे.
- दररोज काही मिनिटे लागतात.
- दिवसाच्या कोणत्याही वेळी आपण सुपर ब्रेन योगाचा अभ्यास करू शकता, पण शक्यतो सकाळी करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला त्याचा परिणाम दिवसभर जाणवेल.
- नियमितपणे केल्यास त्याचा फायदा दिसून येईल.
- दररोज 15 योगा करण्याचा प्रयत्न करा.
- यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची आवश्यकता नाही.
- सर्व वयोगटातील लोक हे करू शकतात.
रेफरेन्सेस :
- https://www.researchgate.net/publication/312220116_Evidence_based_study_on_super_brain_yoga_and_its_application_on_alpha_EEG_in_adolescence
- https://www.artofliving.org/us-en/health-and-wellness/super-brain-yoga
सवू अतिशय सुंदर लेख आज वाचला आमच्या कडे गणपती बसल्यावर व विसजॆनाच्या दिवशी 21 ऊठा बशा काढायची पध्दत आहे मी पण करेल नक्की
Thank you, Pranita 🙂
खुपच छान माहिती मिळाली ग👌👌 सावि 👍👍मी व आरव अन्वी नक्की याचा फायदा घेऊ 👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद
धन्यवाद,रजनी 🙂
Excellent, well structured and most importantly very well related to our traditional rituals . Appreciate such articles from neurologist.
Thank you so much. I appreciate it.
खूप छान माहिती मिळाली आहे ग सावित्रा.
Thank you 🙂
Savi, aaajchya divshi chan mahiti lekhadware dilis. Khup detail mahiti dilis ….khup chan lekh….