आरोग्यम् धनसंपदा


हा लेख इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा: Health is Happiness!

आरोग्य ही शारीरिक, सामाजिक आणि मानसिक परिमाण असलेली एक मानवी स्थिती आहे आणि प्रत्येक परिमाणाला सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन ध्रुव असतात. पॉझिटिव्ह हेल्थ म्हणजे सकारात्मक आरोग्य, ज्यामध्ये आव्हानांना तोंड देण्याची क्षमता असते आणि त्यामुळे जीवनाचा आनंद घेता येतो. उलट निगेटिव्ह हेल्थ म्हणजे नकारात्मक आरोग्य, ज्याचा संबंध आजारपणाशी येतो आणि अकाली मृत्यू होऊ शकतो. सकारात्मक आरोग्य प्राप्त करण्यासाठी निरोगी जीवनशैली अवलंबली पाहिजे ज्यात संतुलित आहार, नियमित शारीरिक व्यायाम, भरपूर पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे, स्क्रीनचा वापर मर्यादित ठेवणे, मानसिक आरोग्य राखणे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

‘आरोग्यम् धनसंपदा’ या टायटल खाली सगळे आरोग्य विषयक लेखांचे संकलन केले आहे. सगळ्या लेखांचे शॉर्टकट दिलेले आहेत. लेखाच्या टायटल वर क्लिक करून पूर्ण लेख वाचता येईल.

Pink divider png, Picture #1895917 pink divider png

व्यायामाचे तंत्र :

नियमित शारीरिक व्यायाम हा निरोगी जीवन जीवनशैलीचा मुख्य घटक आहे. सर्व वयोगटातील लोकांनी शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहणे आवश्यक आहे. निरोगी जीवनाची सुरुवात बालपणापासून सुरू होते. शारीरिक व्यायामामुळे आपण निरोगी, तणावमुक्त रोगमुक्त होऊन दीर्घायुषी होऊ शकतो. प्रौढांनी आठवड्यातून किमान दीडशे मिनिटे व्यायाम करावा. तुमच्या आवडीनुसार आणि जीवनशैलीनुसार योग्य तो व्यायाम निवडू शकता.

Pink divider png, Picture #1895917 pink divider png

समतोल आहार :

अन्न ही आपली मूलभूत गरज आहे. फूड पिरामिडची जागा मायप्लेटने घेतली आहे, ज्या मध्ये पाच खाद्य गट आहेत (फळे, भाज्या, प्रथिने, धान्य आणि दुग्धजन्य पदार्थ). लक्षात ठेवा, कोणतेही फळ, भाजीपाला, नट, बियाणे, शेंगा किंवा संपूर्ण धान्य वाईट नाही. साखरेचे सेवन मर्यादित ठेवा.

Pink divider png, Picture #1895917 pink divider png

ब्रेन पॉवर (मानसिक आरोग्य):

आपण सगळे आनंदी राहण्यासाठी धडपडत असतो. आपला आनंद आपल्या स्वतःच्या हातात असतो. निरोगी शरीरात निरोगी मन वसते. बालपणापासून जीवनातील प्रत्येक टप्प्यावर मानसिकआरोग्य राखणे महत्त्वाचे असते. सुदृढ मानसिक आरोग्यअसणारे लोक दीर्घायुषी होतात आणि आनंदी जीवन जगतात. मानसिक आरोग्य म्हणजे काय आणि ते कसे राखायचे बद्दल पूर्ण माहिती ह्या लेखात दिलेली आहे.

Pink divider png, Picture #1895917 pink divider png

आरोग्यदायी झोप:

प्रत्येकाला झोपेची गरज आहे. झोप ही आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. शारीरिकआणि मानसिक आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. आरोग्यदायी झोपेमुळे स्मरणशक्ती वाढते. पुरेशी झोप न घेतल्यामुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि डिप्रेशन यासारखे आजार होऊ शकतात.

Pink divider png, Picture #1895917 pink divider png

पाणी म्हणजे जीवन!

पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला पाण्याची आवश्यकता आहे. डिहायड्रेशन मुळे डोकेदुखी, थकवा, कमी रक्तदाब होऊ शकते. ज्यूस किंवा सॉफ्टड्रिंक पेक्षा साधे पाणी पिणे सर्वोत्तम आहे कारण त्यात साखर, स्वीटनर आणि इतर केमिकल नसतात. त्या व्यतिरिक्त हायड्रेटिंग पदार्थ खाणे चांगले कारण त्यातून जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर मिळते.

Pink divider png, Picture #1895917 pink divider png

स्क्रीन टाइम : शाप की वरदान?

स्क्रीन टाईम म्हणजे आपण टीव्ही, स्मार्टफोन, व्हिडिओ गेम, टॅबलेट इत्यादी सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणावर घालवलेला वेळ. स्क्रीन टाईमचा वापर माहिती मिळवण्यासाठी, ऑनलाइन लर्निंगसाठी, मनोरंजनासाठी आणि सोशलायझेशन साठी होतो. मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी त्यांना शारीरिक व्यायाम, सकस आहार, पुरेशी झोप आणि पॉझिटिव्ह वातावरण असले पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि स्क्रीन टाईम याचा योग्य बॅलेंस असायला हवा. तंत्रज्ञान माणसासाठी आहे, माणूस तंत्रज्ञानासाठी नाही. स्क्रीन टाईमचे फायदे आणि तोटे समजून घेण्यासाठी हा लेख वाचा

Pink divider png, Picture #1895917 pink divider png

इ…इम्युनीटीचा: 

आपली रोगप्रतिकारक शक्ती जंतुविरूद्ध लढते आणि संसर्गापासून आपले संरक्षण करते. या लढाऊ शक्तीला प्रतिकारशक्ती म्हणतात.रोगप्रतिकारक शक्ती संतुलित असावी. कमकुवत असेल तर आपण सारखे आजारी पडतो. जर आवश्यकते पेक्षा जास्त सेन्सिटिव्ह म्हणजे ओव्हरएक्टिव असेल तर स्वतःच्या शरीराच्या उतींविरूद्ध अँटीबॉडीज बनतात. त्याला ऑटो इम्युन डिसीजेस म्हणतात.

Pink divider png, Picture #1895917 pink divider png

आरोग्याची गुरुकिल्ली-स्क्रीनिंग टेस्ट्स: 

आपण सगळे आपापल्या परीने आपले आरोग्य सांभाळण्याचा नियमित प्रयत्न करत असतो. आजार झाल्यानंतर मग तपासण्या करणे आणि ट्रीटमेंट घेणे ह्या व्यतिरिक्त एक महत्वाची गोष्ट पण आहे. ती म्हणजे काही आजार होण्या आधीच त्यांचा प्रतिबंध करणे. आपण लसी (व्हॅक्सिन) घेऊन काही रोगापासून बचाव करून घेतो. तसेच काही आजार लक्षणे दिसण्या आधीच टेस्ट करून योग्य काळजी घेतली कि त्याचा जास्त त्रास होत नाही आणि आटोक्यात आणायला सोपे पडते. अश्या टेस्ट्सना स्क्रीनिंग टेस्ट्स असे म्हणतात.नियमित पणे स्क्रीनिंग टेस्ट्स करत राहिल्यास बरेच रोग होण्या आधीच निदान करून ट्रीटमेंट करता येते. ह्याबद्दल तुम्हाला माहिती मिळावी ह्या उद्देश्याने हा लेख लिहिला आहे.

Pink divider png, Picture #1895917 pink divider png


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *