हसताय ना ?


काल पासुन माझ्या मनाला सतत वाटत होतं…
आयुष्यात एकदा तरी गांधीजींच्या मार्गानं जावं…
म्हणून मग शेवटी आज मी……..
M G Road वर फिरून आलो !!

***************************************

पुणेरी गिऱ्हाईक : मारुती चे Spare Parts आहेत काय?

पुणेरी दुकानदार : डोळे फुटले आहेत की वाचता येत नाही? बाहेर इतका मोठा बोर्ड टांगलाय आम्ही फक्त मारुतीचेच Spare Parts विकतो.

पुणेरी गिऱ्हाईक : ठीक आहे, एक गदा द्या. 

***************************************

जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का?

नेने : हो, पण पैसे पडतील

जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी.

***************************************

एक मुलगी घट्ट चप्पल घालून कशी बशी चालत जात होती….. (तिला व्यवस्थित चालता येत नव्हते)

एका काकूंनी तिला बघून विचारलं: पोरी चपला ऑनलाईन घेतल्यास कि काय? मुलगी पुण्याची होती सरळ उत्तर थोडंच देणार..

मुलगी : नाही काकू झाडावरून तोडून आणल्या आहे….. काकू पण पुण्याच्याच अन त्यात ही बरमुडा ट्रँगल (शनिवार ,सदाशिव, नारायण पेठ) मधल्या होत्या…

काकूनी सांगितलं : पोरी गडबड केलीस, जरा अजुन पिकु दिल्या असत्यास तर तुझ्या मापाच्या झाल्या असत्या बघ..!!👧🤷‍♀️😂

***************************************

पुण्याच्या टिळक रस्त्यावरून, बाईक वरून जात होतो. एक स्त्री पुढे स्कूटरवर होती. अचानक ती उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याला वळली (अर्थात इंडिकेटर किंवा हात न दाखवता).

मी तिला धडकलो. तिला म्हणालो, “अहो कमीतकमी हात तरी दाखवा वळताना”

तर ती म्हणाली, “त्यात काय हात दाखवायचा?, मी रोजच इकडे वळते”

***************************************

पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना

पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत

पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय??

***************************************

मुलगा : चाहूंगा मॆ तुझे सांज सवरे

मुलगी : आणि दुपारचे काय?

मुलगा : १ ते ४ विश्रांती. मी पुण्याचा आहे

***************************************

पुण्यातल्या एका फ्री वायफाय नेटवर्कचा पासवर्ड, “घे भिकारड्या”

***************************************

भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना

पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?

भिकारी : हा आहे साहेब

पुणेकर : आधी ते खर्च कर.

***************************************

पुण्यातील एक खवचट म्हातारा एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले. कितीही मोठा केला तरी ते आजून मोठा करायला सांगायचे.

म्हातारा म्हणाला, “तोंडात बसून काढणार असाल तर ती पायातली चप्पल आधी काढा”

***************************************

जोशी काकू : बघा, मंडईतून भाजी आणण्यापासून ओलिंपिक मेडल पर्यन्त सगळं बायकांनाच आणावं लागतंय

जोशी काका : आम्ही पुरुष मेडल बीड्ल्सच्या भानगडीत पडत नाहीत कारण कोणतंही मेडल आणले तरी बायको नाक मुरडणारच आणि ते बदलून आणायला पाठवणार…. अगदी गोल्ड मेडल जरी आणले तरी बायकोला डिझाईन पसंत पडेलच याची काय गॅरंटी?

***************************************

आमच्या पुण्यातल्या लोकांना सगळं कसं जवळ हवं असतं

पश्चिमेकडे प्रति शिर्डी तयार करून ठेवलीय आणि दक्षिणेकडे प्रति बालाजी

आता फक्त खडकवासल्यात प्रति अरबी समुद्र तयार करायचा बाकी आहे

मग सगळं कसं जवळ जवळ.

***************************************

स्वारगेट वर मुंबईची मुलगी आपल्या कॉलेज स्टाईल मध्ये तुच्छतेने कंन्डक्टरला विचारते : हे डबडं केव्हा हलणार इथून?

कंन्डक्टर (अदबीने, सस्मित) : कचरा भरल्यानंतर लगेचच !

***************************************

पुणेकर : काका पावशेर रताळे द्या

दुकानदार : पिशवीत देऊ?

पुणेकर : नाही नाही… पेन ड्राईव्ह आणलाय. त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात.

***************************************

पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधून गप्पा मारत होत्या.

जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या.

काही वेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या, “अय्या तू कोण???”

***************************************

पुण्यातील एक नामवंत डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीये. कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं…

पुणेरी पेशंट : हरकत नाही… तुमची उतरल्यानंतर येतो मी परत.

***************************************

बंड्या:- काकू केकवर मेणबत्या ऐवजी बल्ब का लावलाय ?

काकू :- साठावा वाढदिवस आहे ना… एवढया मेणबत्या कशा लावणार

म्हणून साठचा १ बल्ब लावला

***************************************

एका अस्सल पुणेकरांच्या व्हॉट्स अप ग्रुपवर नवीन मेंबरने प्रश्न विचारला :

सिंहगडरोडवर विठ्ठलवाडीच्या आसपास करोना ची लस कुठे देतात, ते मला, प्लीज कुणी सांगू शकेल का ?

एका पुणेकराने उत्तर दिले –डाव्या दंडावर !

***************************************

एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो.

तो नर्सला विचारतो, खायला काय आहे?

नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे…

मुलगा: अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो….!!

***************************************

एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, ” थांबा मी चहा घेऊन आलो…”

१० मिनीटांनी, ” चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया!

***************************************

जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?

तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!

जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?

तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !

***************************************

पेशंट:- डॉक्टर,प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?

डॉक्टर:- ३ लाख रुपये.

पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?

***************************************

एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला….!!

मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत…?

मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.

***************************************

पाहुणा : अहो Camp ला जायला कुठली बस पकडू ?

पुणेरी : २० Number ची पकडा.

पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर?

पुणेरी : १० – १० च्या २ पकडा.

***************************************

पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन:

“अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का.?”

***************************************

बायको: अहो काल डॉक्टर मला सांगत होते की, माझा ‘बीपी’ वाढलाय! पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना?

नवराः अगं ‘बीपी’ म्हणजे ‘बावळट पणा’

***************************************

बाळूः काकू, चिंटू आहे का घरी?

जोशी काकूः आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना?

बाळूः हो

जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये…

***************************************

नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो..

नवरा: प्यायला पाणी आण ग?

बायको: तहान लागली आहे का ?

नवरा (संतापून): नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे.

***************************************

अः देशपांडे आहेत का?

बः (चिडून) पावनखिंड लढवायला गेलेत. काही निरोप?

अः त्यांना म्हणाव, महाराज गडावर पोचले. मेलात तरी चालेल!

***************************************

पुणेरी पाटी…

कृपया कोणीही वर्गणी मागण्याकरिता येऊ नये.

आमच्याही घरी बाप्पांचे आगमन होते . आम्ही तुमच्याकडे मागतो का ?कृपया कोणीही वर्गणी मागण्याकरिता येऊ नये.

आमच्याही घरी बाप्पांचे आगमन होते . आम्ही तुमच्याकडे मागतो का ?

***************************************

पुणेरी ग्राहक :- अंडर वेअर दाखवा…

दुकानदार :- ही पहा…

पुणेरी ग्राहक :- कितीला आहे…?

दुकानदार :- फक्त ₹ 850/-

पुणेरी ग्राहक :- दररोज घालायची दाखवा Partywear नकोय…

***************************************

पुणेकर : काय हो गहू कसा आणला?

कोल्हापूरकर : पिशवीतून आणला

पुणेकर : कितीला आणला?

कोल्हापूरकर : दुपारी दीड वाजता आणला.

पुणेकर : तसं नाही हो. कोणत्या भावाने आणला?

कोल्हापूरकर : चुलत भावाने😂

***************************************

एक सदाशीव पेठी चिरंजीव (कधी नाही ते) प्रेमात पडले, आणि प्रेयसीला खालील प्रमाणे पत्र लिहिले.

त्यांच्या प्रेमाचा काय निकाल लागला ते पत्र वाचल्यावर लक्षात येईलच!

प्रिय xxxxxx,

                   तू मला खूप आवडतेस. मला तुझ्याशिवाय चैन पडत नाही. तु माझी होशील कां? (हो म्हणण्यापूर्वी खालील अटी मान्य कराव्या).

  • १) दूपारी १ ते ४ फोन करु नये.
  • २) परफ्यूम, लिपस्टीक, ड्रेस, साड्या माझ्याकडे मागू नये, आपल्या तीर्थरुपांकडून आणणे.
  • ३) हाॅटेलमधे गेल्यास निम्मे बील भरावे.
  • ४) महिन्यात फक्त एक सिनेमा दाखवला जाईल.
  • ५) बाईकवर बसताना मला मिठी मारु नये, रस्त्यावर श्रुंगारीक चाळे करणे मला पसंत नाही.
  • ६) पर्वतीवर फिरायला जाण्यासाठी वेळेवर यावे, ऊशीर करु नये. तू रिकामी असलीस तरी मला नोकरी आहे.
  • ७) भेळ, पाणी पूरी, आईस्क्रीम जास्त खाऊ नये, माझ्या पगाराचा आकडा लक्षात ठेवावा.
  • ८) भांडण झाल्यास फक्त एकदा समजूत काढण्यात येईल, नंतर अपमान होईल.
  • ९) मी सतत तुझीच तारीफ करावी अशी अपेक्षा ठेवू नये, मला स्वतःची तारीफ करण्यास वेळ द्यावा. आणि सगळ्यात महत्वाचे
  • १०) माझे प्रेम मान्य नसल्यास मी दिलेलं गुलाब पुष्प परत करावे, त्याची नासधूस करु नये. मी त्याचा अन्यत्र वापर करीन.💐💐💐💐💐

ती सुद्धा सदाशिव पेठेतलीच, यावर तिने उत्तर दिले.

प्रिय xxxxx,

                    लिहीण्याची पद्धत म्हणून प्रिय लिहीले आहे. इतक्यात गैर अर्थ काढू नये. पहिली गोष्ट, तू पाठवलेल्या पत्रावर पुरेसे तिकीट लावलेले नव्हते. लिफाफ्यावर तुझे नाव नसल्याने मी दंड भरून पत्र घेतले. आधी कल्पना असती तर परत पाठवले असते. पुन्हा असा हलगर्जी पणा सहन केला जाणार नाही. यावेळी भरलेला दंड भेटू तेव्हा परत करावा.

१.१-४ मी झोपलेली असते. तेव्हा फोन करीन अशी अपेक्षा करणे हा माझा अपमान आहे.

२. टॉक टाईम दिल्यासच मी फोन करीन. अन्यथा फोन मी करणार नाही.

३. घरचे सोडून हॉटेलात जाण्याची हौस मला नाही. तू घेऊन गेल्यास मी बिल भरण्याचा प्रश्न येत नाही. ते तुलाच भरावे लागेल.

४. मला सिनेमा पहायचा असल्यास मी कोणाही बरोबर जाऊन पाहीन. मी तुझ्याच बरोबर जावे असा हट्ट असल्यास मध्यंतरात चहा आणि वड्यासह सर्व खर्च करावा लागेल .

५. जर बाईकवर मिठी तुला चालणार नसेल तर इतर कोणामागे बसण्याचा हक्क मी राखून ठेवीत आहे.

६. मी फिरायला माझ्या वेळेवर जाते. तू थांबबणार नसशील तर जो थांबेल त्याच्या बरोबर जाईन. मग हरकत चालणार नाही. 💐💐🙏🙏🙏💐💐💐

***************************************

काल पुण्यात गेलो होतो. एक विदेशी स्त्री भेटली.

म्हणाली *”व्हेअर इज खत्रुड?”.

मी म्हणालो, “हिअर इन पुणे एव्हरीबडी इज खत्रुड”.

ती म्हणाली, “आय डोन्ट अण्डरस्टँड.”

तिने कागद दाखवला तर त्यावर लिहिले होते…… *KOTHRUD….!!!*

***************************************

पुणे : एकदा पुण्यात ‘लक्ष्मी रोडवर’ एक अवकाश यान येते.. आकाशातून मोठा लाईट मारुन एलिअन लोक घोषणा करतात..

” आजपासून पुणे आमच्या ताब्यात आहे..!! “

खालून गोखले आजोबा :पार्किंग मिळते का ते बघ आधी..!!

***************************************

पत्रकार : गुढी उभारताना काठीवर तांब्या उलटाच का ठेवायचा ?

जोशी काकांचे उत्तर : तुम्ही सरळ ठेऊन दाखवता का ??

न्युज वाले पळाले

***************************************

रेल्वेमध्ये आई आणि मुलगा प्रवास करत असतात…

आई म्हणते, “बाळा कोणतं स्टेशन आलं रे”

मुलगा खिडकीतून बाहेर बघतो….

प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला विचारतो, “काका कोणतं स्टेशन आहे हे?”

माणूस:- देवाने जे दोन डोळे दिलेत ना, त्याचा वापर करा…. गाडी फलाटावर येताना काय झोपा काढत होता का…? मोठी काळी-पीवळी पट्टी दिसली नाही स्टेशनची येताना…! तुम्ही हल्लीची पोरं…. कष्ट करायला नकोत… सगळं आयतं पाहीजे… . . . .

मुलगा:- आई…. पुणे आलं.

***************************************

बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,

आज रात्री मी पूरी करणार आहे..

नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो.

लागला ना डोक्याला शॉट? वाचा नीट परत एकदा.

***************************************

बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .

गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..

कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा.

***************************************

योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.

मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?

योगेश : ते नंतर, आधी पोहे, चहा

आणि मुलगी बघणे तर होऊ द्या. मग बसू !

***************************************

चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?

झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.

चिंगी: कितीजण होते धावायला?

झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !

***************************************

मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.

मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..

आई: हरामखोर, त्या तुझ्या मावश्या आहेत.

***************************************

गुरुजी : काय समजले नसेल तर विचारा..

बंड्या : गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.

गुरुजी डोकं आपटून मेलं.

***************************************

नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.

बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,

नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.

***************************************

शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते?

बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.?

मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली.

***************************************

एकदा नवरा बायको Discovery बघत असतात. Channel वर म्हैस दिसते.

नवरा: ती बघ तुझी नातेवाईक.

बायको: अय्या…सासूबाई !

***************************************

आई :- चिंटु लवकर आंघोळ करून घे, नाहीतर शाळा बुडेल..!

चिंटु :- आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् ग ?

आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला.

***************************************

बायको: अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.

नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते !

***************************************

गुरुजी :-गण्या, मी तुला कानफटीत मारली ह्याचा भविष्यकाळ सांग बघू?

गण्या :- जेवनाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होनार!

***************************************

एका मैत्रिणीने Hi पाठवलं.

मी पण रीप्लाय दिला Hi म्हणून..

तिने विचारलं काय चालु आहे.

मी रीप्लाय दिला.

२ ट्युब लाइट.. १ फॅन.. १ टीव्ही..१ मोबाइल अणि तु..

डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव!

***************************************

केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं, डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर

डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?

***************************************

बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास?

जरा त्या पिंकीकडे बघ, तिला नव्वद टक्के मिळाले आहेत..

चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !

***************************************

मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे

मुलगी: आणि दुपारी?

मुलगा: १ ते ४ आराम

मी पुण्याचा आहे ना!

***************************************

स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,

तो म्हणजे

फोटोग्राफर.

***************************************

तीन उंदीर गप्पा मारत असतात,

पहिला उंदीर : मी विषारी गोळ्या आरामात चघळतो..

दुसरा उंदीर : मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.

तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो,

पहिला आणि दुसरा विचारतात, काय झालं कुठे चालला?

तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा किस घेऊन.

***************************************

एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा लावत होती तेवढ्यात.

नवरा : अगं हे काय करतेस?

बायको : अहो दसरा आहे ना आज ! म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं.

***************************************

शिक्षक: उशीर का झाला शाळेत यायला?

चिंटू: आई बाबा भांडत होते,

शिक्षक: त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?

चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता.

***************************************

मी तिला बोललो I LOVE U

मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.

मैंने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा

OLX पे बेच दे..

***************************************

ट्रेन मध्ये गावाकडील बाई लहान बाळाचे लंगोट बदलत असते.

शहरी बाई: हग्गीस नाही का?

गावाकडील बाई: नाही, फक्त मूतीस.

***************************************

मुलगी: माझे हृदय म्हणजे माझा

मोबाईल आहे आणि तू त्यातले

सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस..

मुलगा: राणी एक विचारू ?

मुलगी: हो विचार ना..

मुलगा: मोबाईल डबल सिमचा तर नाही ना ?

***************************************

लहान मुलगा : आज्जी नमस्कार करतो.

पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय.

आज्जी : आशीर्वाद सावकाश पळ रे बाबा !

***************************************

जो नेहमी हसत असतो त्याला HAS MUKH म्हणतात.

आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला HUS BAND म्हणतात.

***************************************

आई: बेटा तू केस का कापत नाही?

मुलगा: फॅशन आहे आई

आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय

लहान मुलगी पसंद आहे म्हणून, आता जा नांदायला.

***************************************

एक मैत्रीण :- तु खुप बोर झाल्यावर काय करतेस ?

दुसरी :- मस्तपैकी मॉलमध्ये जाते, मन भरेपर्यंत शॉपिंग करते,

आणि ट्रॉली काऊंटरलाच सोडून घरी येते.

***************************************

एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,

तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,

बायको: काय आहे?

नवरा: या २ वायरांपैकी एक जरा धर,

बायको: हं धरली,

नवरा: काही जाणवलं का?

बायको: नाही,

नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे तर !

***************************************

काही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस

My dad is my real hero

मग आमच म्हातार काय नीळू फुले आहे का.

***************************************

एक महिला डॉक्टरांना: यांना ठिक करा हो,

हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात,

डॉक्टर: ही तर चांगली गोष्ट आहे,

तुम्ही फार लकी आहात,

स्त्री: कसली लकी,

उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून !

***************************************

अगर कभी टूट कर बिखर जाओ तो मुझे याद कर लेना .

क्यों की मेरे पास रुपये 5/- वाला fevi-quick बेकार पड़ा है.

***************************************

बायको: अहो एक सांगू का, पण मारणार तर नाही ना?

नवरा: हो सांग ना,

बायको: मी गरोदर आहे,

नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे, मग तू एवढी घाबरतेस का?

बायको: कॉलेजला असतांना ही बातमी बाबांना सांगितली होती,

तेव्हा त्यांनी मारलं होतं !

***************************************

स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.

बायको: एकटीच आली असेल?

नवरा: हो तुला कसं माहीत?

बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता.

***************************************

सासू: कित्ती वेळा सांगितलंय बाहेर जातांना टिकली लावत जा

सूनबाई: अहो सासूबाई, जीन्सवर कुणी टिकली नाही लावत

सासू: अगं जीन्सवर नाही, कपाळावर लाव, भवाने !

***************************************

नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे,

बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न.

मला कशाला गटवलीत?

नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा.

***************************************

तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल,

तर अविवाहित असतांना बदला.

लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण

बदलू शकत नाही.

***************************************

गुरुजी- दळणवळण म्हणजे काय?

विद्यार्थी- एखादी मुलगी दळण घेऊन जाताना वळून पाहते त्याला दळणवळण म्हणतात.

गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत.

***************************************

मास्तर : सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का

मुलगा : आहे ना

मास्तर : कोणती सांग

मुलगा : टिंब. ?

मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली ?

***************************************

शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन..

पप्पू: ओके सर.. पण जरा झणझणीत बनवा..

मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो.

***************************************

देव आणि पतीदेव यांच्यात फरक काय?

देवाची आरती – सुखकर्ता दुःखकर्ता…

पतिदेवाची आरती – असेकर्ता तसेकर्ता आणि काकर्ता.

***************************************

मुलगा: तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील,

की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील ?

मुलगी: तुटलेल्या चपलेने मार खाशील,

की चप्पल तुटेपर्यंत मार खाशील ?

***************************************

कोणीतरी खरंच म्हणून गेलंय कि, आयुष्य फक्त २ दिवसाचं आहे.

शनिवार आणि रविवार

आणि हि गोष्ट आपल्याला सोमवारी पटते.

***************************************

जर कोणी आपल्याला पाहुन दरवाजा बंद केला तर,

आपण पण त्याला दाखवुन द्यायचे,

की दरवाज्याला दोन कड्या असतात.

***************************************

गर्लफ्रेण्ड: प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन.

बॉयफ्रेण्ड: का?

गर्लफ्रेण्ड: बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन,

आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन.

***************************************

मुलगी फेसबुक वर स्टेटस टाकते.

हॅलो फ्रेंड्स, मी मावशी झाले

बंड्याने खाली Comment टाकली.

कोणत्या हॉस्पिटलला ? किती पगार आहे ?

***************************************

पिंटया: गोव्याला चाललोय

जातांना रस्त्यात बायकोला दरीत टाकून देणार आहे,

चिंटया: माझी पण घेऊन जा आणि ढकल,

पिंटया: तुझी येतांना ढकलली तर चालेल का ?

***************************************

रात्री भुताची मालिका बघून झाल्यावरचा संवाद:

बायको: अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा,

मला भीती वाटतेय..

नवरा: हा, म्हणजे मी भिऊन मरतो.

***************************************

मुलगी: नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा.

मुलगा: ते ठीक आहे पण आधी सांग मी तुझा कितवा?

***************************************

बायको आकाशात चांदणी बघुन म्हणते,

अशी कोणती वस्तु आहे जी तुम्ही रोज बघू शकता, पण आणू शकत नाही.

नवरा: शेजारीण!

लय मारला घरात नेऊन.

***************************************

धर्मेंद्रच्या घरी एक माणूस चोरी करत असतो,

धर्मेद्र चिडून मोठयाने बोलतो: कमीने !

चोर: हो रे बाबा, कमीच नेतोय.

***************************************

लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न:

उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये द्यावे,

आता तुमच्या बायकोने तुम्हाला मारणे बंद केले आहे का?

***************************************

मुलगीः माझा मोबाईल आता आईकडे असतो

मुलगाः मग तुझ्या आईने पकडलं तर

मुलगीः तुझा नंबर मी लो बँटरी नावाने सेव केला आहे

तुझा फोन आला की आई बोलावते लो बँटरी झाली मोबाईल चार्ज कर.

***************************************

काय माहित तिला स्वतःच्या सौंदर्याचा एवढा का गर्व आहे,

बहुतेक तिचं आधार कार्ड अजून आलेलं नसेल.

***************************************

बायको : अहो मी एक रुपयाचे 3 कांदे आणले,

नवरा : कसे काय?

बायको : एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला.

नवरा : मग तिसरा ?

बायको : तिसरा त्याने मला फेकून मारला !

***************************************

संतूर साबणाच्या ऍडमध्ये लहान मुलीची मम्मी दाखवतात

पण पप्पा कधी नाही दाखवत? का? ते निरमा लावतात का?

***************************************

पेपर सुटल्यानंरच्या प्रतिक्रिया:

दहावी अ : सगळं सोप्प होतं.

10 वी ब : काही प्रश्न सोपे होते.

दहावी क : बरा होता पेपर.

10 ड :  मॅडम काय दिसत होती.

***************************************

डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?

रुग्ण: बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.

डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता.

रुग्ण: तेच तर केले होते.

***************************************

इंजिनियरिंगचा फॉर्म भरायला आलेल्या मुलाने, कॉलेजच्या चौकीदाराला विचारले.

कॉलेज चांगलं आहे ना ?

चौकीदार: खुप छान आहे !

माझं इंजिनियरिंग सुद्धा इथेच झालं होतं.

***************************************

सुखी राहायचं असेल, तर नेहमी आतला आवाज ऐका.

आतला आवाज म्हणजे, स्वयंपाकघराच्या आतला आवाज

“अहो ऐकल का ”

***************************************

मुलगा: मला तुझी आठवण आली कि, मी तुझा फोटो बघतो.

मुलगी: अय्या, आणि माझा आवाज

ऐकावासा वाटला तर तू काय करतोस?

मुलगा: शेजारच्या कुत्रीला दगड मारतो.

***************************************

मुलगा :मी माझ्या गर्लफ़्रेंड ला गेली ३ वर्षे दररोज पत्रं पाठवली,

मित्र : मग? काय झालं शेवटी?

मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं!

***************************************

हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर तुमचे पैसे वाचू शकतील.

फक्त तिला म्हणा कि, बोल जाडे! आज काय खाणार ?

***************************************

मुलगी : तुला माझी आठवण कधी येते रे जानू?

मुलगा : जेव्हा जेव्हा आई म्हणते, येवू दे तुझ्या बायकोला घरातली

सगळी कामे कशी करून घेते बघ!

मुलगी : तू Single च मर कुत्र्या.

***************************************

नवरा बायकोचं भांडण चालु असतं.

नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर

माझ्या मधला जनावर बाहेर येईल.

बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय.

***************************************

माणूस: साहेब,माझी बायको हरवलीय.

हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस

स्टेशन नाही..तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा.

माणूस: च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाहीये.

***************************************

भारतात बिस्कीट उत्पादन करणाऱ्या दोन प्रसिद्ध कंपन्या:

१) मारी गोल्ड २) पारले जी,

एक कपात जात नाही, दुसरा कपात गेला की परत येत नाही.

***************************************

बायको: माझी मैत्रीण येणार आहे, दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा.

नवरा: बरं.. पण वचन दे,

माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील !

***************************************

जगातील सगळ्यात फास्ट नेटवर्क दोन प्रकारे आहे..

1) Email

2) Female

एका मिनिटात इकडची गोष्ट तिकडे पोहचवतात!

***************************************

एका मठावर गेलो होतो,

सात साधू सात चटयांवर बसले होते,

मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले,

बाबा पोरी भाव देत नाहीत काय करु?

बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले,

गोमटेश्वरा आणखी एक चटई टाक बाबा.

***************************************

गर्लफ्रेंडचे वडील: पगार किती तुला?

पप्पु: 16000..

गर्लफ्रेंडचे वडील: माझ्या मुलीला मी 15000 पॉकेट मनी देतो..

पप्पु: तेच धरुन 16000!

***************************************

एकदा बस मध्ये खूप गर्दी असते. उभे राहुन कंटाळलेली एक बाई

एका गाठोड्यावर बसते.

एक माणूस: बाई, गाठोड्यावर नका बसु टरबुज फुटतील.

बाई: गाठोड्यात टरबुज आहेत का?

माणूस: नाही, खिळे आहेत.

***************************************

एकदा सोन्या गर्लफ्रेंड ला हॉटेल मध्ये घेऊन जातो.

वेटर : काय देऊ?

सोन्याची गर्लफ्रेंड : भरपूर भाज्या असलेली चपाती द्या.

सोन्या : आरे बाबा पिझ्झा दे.. झोपड पट्टीतला आयटम आहे.. घे समजून!

***************************************

रात्रीचे अडीच वाजलेले असतात,

बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते,

नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो,

नवरा : काय झालं? काय झालं?

बायको : काही नाही, तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात.

आधी गोळी घ्या न मग झोपा.

***************************************

बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या,

बाई : मुलांनो तुकाराम लिहून दाखवा पाहू..

बंडू : बाई, तुकारामाची तू पहिली का दुसरी?

बाईंनी बंडूला झोड झोड झोडला.

***************************************

एक शेतकरी खुप आजारी असतो,

त्याची पत्नी म्हणते: तुमचा ताप वाढतच चाललाय,

थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते,

खुराडयातला कोंबडा खडबडून जागा होतो,

कोंबडा म्हणतो: ओ ताई! आधी क्रोसीन देऊन पहा ना,

लगेच काय चिकन सूप?

***************************************

काल एका मुलीँला मस्करीत म्हणालो,

दिल चीर के देख, तेरा हि नाम होगा

कालपासून चाकू घेऊन मागे लागलीये !

येडी.. कुठली !

***************************************

मोबाईल विकत घेतल्यावर, आणि लग्न केल्यावर,

माणसाला एकाच गोष्टीचा राग येतो.

थोडं अजुन थांबलो असतो,

तर चांगलं मॉडेल मिळालं असतं.

***************************************

१२ वी नंतर ग्रॅडजुएशन करणे तितकेच महत्वाचे असते,

जितके मेल्यानंतर तेरावा करणे महत्वाचे असते..

होत काहीच नाही, फक्त आत्म्याला शांती मिळते !

***************************************

यमराज : बोल मानवा, तुला कुठे

जायचं आहे, स्वर्गात कि नरकात?

मानव : देवा, पृथ्वीवरून माझा

Mobile आणि Charger मागवून घ्या.

मी कुठे पण राहायला तयार आहे!

***************************************

शिक्षक : सांग माकडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

गण्या : मंकी.

शिक्षक : खरं सांग पुस्तकात बघून बोललास ना.

गण्या : नाही सर देवा शपथ.

मी तुमच्याकडे बघून बोललो !

***************************************

पाऊस जास्त असल्यामुळे कृपया मुलींनी,

शक्यतो घराबाहेर पडु नये..

कारण पावसामुळे,

MAKE UP उतरला तर,

BREAK UP होऊ शकतो.

***************************************

एका गावात शुटींग होते,

मुलगी: आई गावात शुटींग होत आहे..

आई: जाऊ नको तिथे.

आई: हीरो कोण आहे?

मुलगी: ईमरान हाश्मी.

आई: अगं बाई! मग आजीलाही आत घे.

***************************************

इंग्लिश माणुस आजीबाईला :What Is Your Name?

आजीबाई : महा काही नेम नाही भाऊ

आज हाय उद्या नाय!

***************************************

आयुष्यात अश्रू पुसणारे बरेच मित्र मिळतील,

पण नाक पुसणारे मिळणार नाहीत. म्हणुन रुमाल नेहमी सोबत ठेवा.

***************************************

३ मुंग्यांना १ केक दिसतो.

पहिली जाते आणि केक खाते.

दुसरी पण जाऊन खाते.

तिसरी नाही खात का ?

ती म्हणते: शिईईईई.

केक ला मुंग्या लागल्यात!

***************************************

बायकोचा राग आला तर तो गिळा,

नाहीतर गिळायला मिळणार नाही.

***************************************

तुमचे वडील गरीब असतील,

तर ते तुमचं दुर्भाग्य.

पण तुमचा सासरा गरीब असेल,

तर तो तुमचाच गाढवपणा.

***************************************

पोरांचं एक मात्र भारी असतं..

गर्लफ्रेंड जीन्सवाली असावी पण,

बायकोने मात्र साडीच नेसावी.

***************************************

आई घाबरून म्हणाली: बाळा तु लवकर घरी ये,

सुनबाईला पेरेलिसिसचा अटॅक आलाय..

तोंड वाकडं, डोळे वर आणि मान वळलीय बघ..

मुलगा: आई तु घाबरू नकोस शांत रहा,

ती सेल्फी काढत असेल.

***************************************

वडील: उद्या Result आहे ना रे?

मुलगा: हो..

वडील: जर का नापास झालास तर,

तुझा माझा संबंध संपला..

दुसऱ्या दिवशी,

वडील: काय आला रे Result?

मुलगा: तु कोण रे मला विचारणारा?

***************************************

फुलाचा सुगंध चोरला जात नाही,

सूर्याची किरणे लपवली जात नाही,

आपल्याबरोबर कितीही चांगली बायको असली तरी,

दुसऱ्याची बघितल्याशिवाय अंगातली मस्ती जात नाही.

***************************************

मुलगी: मी शेजारच्या पांडुवर प्रेम करते

आणि त्याच्याबरोबर पळून जात आहे..

बाप: धन्यवाद !

माझा पैसा आणि वेळ वाचवल्याबद्दल..

मुलगी: अहो, बाबा मी पत्र वाचते आहे,

बहुतेक आई पळाली.

***************************************

तिने मला पाहीले,

मी तिला पाहीले.

आणि असंच,

पाहता पाहता,

माझे २ विषय राहिले.

एक अनुभवी विद्यार्थी!

***************************************

प्रेमा मध्ये सर्व काही माफ असतं,

पण.

पहिली सोडून दुसरीला पटवणं,

पाप असतं.

***************************************

एक गरोदर बाई डॉक्टर कडे जाते,

डॉक्टर तिला विचारतात कितवा महिना?

बाई म्हणते आठवा.

डॉक्टर म्हणतात,

ईश्श्श मी कसा आठवु! तुम्हीच सांगा.

***************************************

आजोबा: बन्या जरा माझी कवळी आन.

बन्या: अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!

आजोबा: माहितीये रे.

समोरच्या गोखले आजींना स्माईल दयायची आहे!

***************************************

मुलगी ( Customer Care ला ): मला १ मेसेज,

१५ जणांना पाठवायचा आहे, कसा करू?

Customer Care: मेसेज काय आहे?

मुलगी: हाय जानू, काय करतोयस?

माझा रिचार्ज संपलाय १०० चा रिचार्ज कर ना.

***************************************

ज्याप्रकारे पापाचा घडा भरला कि मृत्यू होतो,

त्याचप्रकारे आनंदाचा घडा भरला कि लग्न होते !

***************************************

बहिणीच्या विदाई मध्ये तिचा लहान भाऊ विचारतो,

ताई, फक्त तुच का रडत आहेस,

दाजी का नाही रडत?

वडील: बाळा ताई फक्त गेट पर्यंत रडेल..

मग तिकडून दाजी आयुष्यभर रडतील !

***************************************

जर बायको ऐकत नसेल तर

सरळ चप्पल काढा

आणि घालून बाहेर पडा.

तुम्ही जो विचार करत होतात

त्यासाठी वाघाचं काळीज लागतं राव.

***************************************

नवऱ्याने शॉपिंग ला वाट्टेल तेवढे पैसे खर्च केले तरी,

बायको शेवटी Thank You दुकानदारालाच म्हणणार !

***************************************

असं म्हणतात की जिथं एकदा,

विश्वासघात होतो तिथं पुन्हा जाऊ नये,

पण काय करणार,

सासरवाडीत पुन्हा जावंच लागतं.

***************************************

बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे,

पुरुषांचे काय

बायका दिसल्या कि, खुश होतात !

***************************************

जर आपली बायको, माहेरी जातांना,

शेजारच्या बायकांना सांगून जात असेल की,

ताई जरा लक्ष ठेवा!

तर समजून जा, तुम्ही CCTV च्या निगराणीत आला आहात.

***************************************

बायकोच्या चॉईस वर हसण्याची चूक करू नका,

लक्षात ठेवा तुम्हीही तिचीच चॉईस आहात !

***************************************

गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्रजीत म्हणून दाखव बघू !

७०, ८२, ८८, ९९

बबन: शेवंती येती तू? येती ये, नाय तं नाय !

***************************************

आयुष्यात इतकी मान खाली घालायची वेळ कधीच

आली नव्हती.

जितकी व्हाट्सअँप फेसबुक मुळे आली आहे !

***************************************

लव्ह मॅरेज मध्ये आपण आपल्या प्रेयसी बरोबर लग्न करतो,

आणि अरेन्ज मॅरेज मध्ये आपण दुसऱ्याच्या प्रेयसी बरोबर लग्न करतो.

***************************************

बायको: साबुदाणा वडा बनवू का तुम्हाला?

नवरा: नको मी माणूसच ठीक आहे,

आली मोठी जादुगरीन!

***************************************

शेवटी आज आई बोललीच,

बाळा बायको कमी शिकलेली

असली तरी चालेल, पण.

Facebook, Whatsapp वापरणारी नको,

आपल्या घरी इतर कामं पण असतात.

***************************************

एका भारतीय महीलेचा मोदींना प्रश्न,

मंगळ सुत्रात ब्लॅक मनी चालतील का?

का ते पण काढुन टाकायचे.

***************************************

गांधीजी म्हणाले,

दारू सोडा आणि पाणी प्या.

तेव्हापासून लोक तिन्ही

एकत्र करून पितात.

नीट वाचा.

***************************************

टिचर: कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा!

गण्या: आलिया भट्ट..

टिचर: माकडा ! वर्गाच्या बाहेर हो!

मक्या: ओ मॅडम, बोबडा आहे तो.

त्याला ‘आर्यभट’ म्हणायचंय!

***************************************

BF: मला तुझे दात खूप आवडतात.

GF: अय्यां खरंच का रे?

BF: कारण Yellow माझा फेवरेट कलर आहे.

***************************************

मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने

मच्छर खाल्ले,

बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस

डॉक्टरला बोलाव,

मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण

नाही बाईसाहेब.

मी त्याला All Out पाजले आहे.

***************************************

दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं.

त्या मुली पण परी हु मै गाणं लागल्यावर असा Attitude दाखवतात,

कि आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच.

***************************************

गणपतीला दोन बायका असतात,

रिद्धी आणि सिद्धी.

सामान्य माणसाला एकच बायको असते,

ती पण जिद्दी.

***************************************

डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?

नवरा: बरं वाटतंय तिला आता,

आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय.

***************************************

ATM मधून 200 रुपये

निघतांना इतका आवाज होतो की,

असे वाटते चुकून 4-5 हजार निघतात की काय.

मशीन पण चेष्टा करते गरीबाची.

***************************************

आज मी ३३ कोटी देवांना एकच विनंती केली.

मला संपत्ती नको, मला बंगला नको,

मला नोकरी नको, मला गाडी नको,

फक्त सगळ्या देवांनी एक-एक, रुपया द्यावा !

***************************************

सासु आणि सुन यांचं का पटत नाही

माहीत आहे का? नावातच घोड आहे,

सा – सारख्या

सु – सुचना

आणि…

सु – सुचना

न – नको.

***************************************

तिचा फोन आला,

खुप अकडुन ती म्हणाली,

विसरुन जा मला.

मी म्हणालो,

आधी नाव तरी सांग कोण आहेस तु?

***************************************

बायको: माझी एक अट आहे,

नवरा : काय?

बायको: तूम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार,

नवरा: माझी पण एक अट आहे,

बायको: काय?

नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे.

***************************************

एक छोटी मुलगी दुकानदाराला विचारते,

काका तुमच्याकडे

चेहरा गोरा करायची क्रीम आहे का?

दुकानदार: हो आहे ना.

मुलगी: मग लावत जा ना काळ्या,

मी रोज किती घाबरते.

***************************************

लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे?

लहानपणी चिवडा, फरसाण, चकली

याला खाऊ बोलणारी मुले,

मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात.

***************************************

बंडया: बाबा मला Blackberry किंवा Apple पाहिजे,

बाबा: कारट्या तो फणस आणलाय तो संपव आधी.

***************************************

गंप्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो,

गंप्या: तुला आई ओरडत नाही का?

मुलगी: हो, आजच ओरडली तिचा ड्रेस घातला म्हणून.

***************************************

बँक मधून मुलीला फोन आला,

तुम्हाला Credit Card पाहीजे का?

मुलगी: नको माझ्याकडे Boyfriend आहे.

***************************************

एकदा नवरा बायको खुप भांडत असतात,

नंतर बायको लुंगी आणून

नवऱ्याच्या अंगावर फेकते,

बायको: बदला लुंगी

नवरा: ( घाबरून ) हे तु मराठीत बोललीस का हिंदीत ?

***************************************

सरदार: डॉक्टर मला जेवण केल्यावर

भूक लागत नाही, झोपून उठल्यावर

झोप येत नाही, काय करू?

डॉक्टर: रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल.

***************************************

चिंटुः आई परी आकाशात उडते का गं?

आईः हो..

चिंटु: मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात?

आईः अरे वेडया ती कशी उडेल? ती परी आहे का?

चिंटुः पण बाबा तिला तर परी म्हणतात,

आईः हो का! मग उद्या उडेल ती बघच तु !

***************************************

बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे,

कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे.

नवरा: Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना !

***************************************

एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते.

आणि ३ दिवसांनी परत घरी येते,

वडील(रागाने): आता काय हवंय?

मुलगी: बारीक पिनचा चार्जर !

***************************************

टिचर: बंडया तु वर्गात

सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?

बंडया: बाई मी गरीब घरचा आहे मला

Whatsapp परवडत नाही.

***************************************

सर: इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे,

आता सांगा तुम्ही यातून काय शिकलात?

गण्या: सर आता फक्त आपल्याला दारू

आणि चकणा घेऊन जायचं आहे.

***************************************

तो तिला म्हणाला,

जीना सिर्फ मेरे लिए !

ती म्हणाली,

ठीक आहे मी लिफ्ट ने जाते,

तू ये जिन्याने.

***************************************

आज पेपर मध्ये जाहिरात होती.

एक साडी घ्या व 50% वाचवा

मी पेपरच फाडला व 100%वाचवले.

***************************************

नातेवाईकांना फेसबुक फ्रेन्ड बनवणे

म्हणज फुकटात CCTV बसवणे.

***************************************

ज्योतिषी: तुझ्या कुंडली मध्ये तर पैसाच पैसा आहे.

गण्या: ज्योतिषी काका पण कुंडली मधून बैंक अकाउंट मध्ये ट्रांसफ़र कसे करायचे?

***************************************

सासू : तुला किचनमध्ये काय येतं?

सून : कंटाळा.

विषय संपला.

***************************************

नवरा : प्रिये, आज चहा असा बनव

कि तन मन डोलायला लागेल.

बायको : दूध आपल्याकडे म्हशीचं येतं, नागिनीचं नाही.

***************************************

चेहरा काळा असेल तर क्रीम लावतात

आण जरा कर्म काळे असेल तर

मोबाईलला पासवर्ड लावतात..

***************************************

विवाहित पुरुषांचं पोट वाढण्याचा कारण..

मित्रांन सोबत पोट भरून पार्टी केल्या नंतर..

बायकोच्या भीतीने घरी जाऊन परत जेवण करणे..

***************************************

कधी कधी हे कळत नाही की?

Internet free आहे की आपण ?

***************************************

गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,

तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?

बंड्या : एकही नाही. कारण,

ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते.

तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील.

***************************************

पप्पूचं लग्न झालं आणि त्याचा संसार सुरु झाला.

एकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो.

तू माझ्यात असं काय पाहिलंस की मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस ?

पप्पूची बायको : मी तुम्हाला एकदोन वेळेस भांडी घासताना पाहिलं.

***************************************

पुणेकर आपल्या मुलाला खुप मारत होता.

शेजारी : का मारता आहात मुलाला ?

पुणेकर : अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते,

हा गाढव दोन पाय-या सोडून चढला.

शेजारी : अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना.

पुणेकर: अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात.

***************************************

बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या.

वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत !

बंड्या : एक किक् मारायला, न् एक गिअर बदलायला.

लय हानला !

***************************************

बायकांची प्रार्थना

हे देवा माझ्या नवऱ्याला पैसा, धन, दौलत, यश सारं दे, माझ्यासाठी काही नको.

त्याच्याकडुन कसं घ्यायचं ते मी बघते.

***************************************

परदेशी नवरे बायकोने केलेला स्वयंपाक काट्याने खातात,

भारतीय मुकाट्याने !

***************************************

एका बाईला १० मुलं असतात.

पत्रकार : अहो, या पहिल्या मुलाचं नाव काय?

बाई : मुन्नू.

पत्रकार : बरं, या दुस-या मुलाचं नाव काय?

बाई : मुन्नू.

पत्रकार : बरं, आणि या बाकिच्या मुलाचीं नाव काय आहेत?

बाई : सगळ्यांची नावं मुन्नू.

पत्रकार : अहो, मग तुम्ही त्यांना ओळखता कसं?

बाई : अहो, प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत ना.

***************************************

बंडया रडत रडत घरी आला.

बाबांनी विचारले, “काय झाले बंडया?”

बंडया: मास्तरांनी मला मारलं.

बाबा: काहितरी आगावूगिरी केली असशील.

बंडया: नाही बाबा. मास्तरांनी प्रश्न विचारला की ३ लिंगे कोणती?

बाबा: मग तू काय म्हणालास?

बंडया: पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुसलिंग.

बाबा: बरोबर आहे. मग का मारलं?

बंडया: मास्तरांनी उदाहरण विचारले

बाबा: तु काय म्हणालास?

बंडया: तो फळा, ती शाळा आणि ते मास्तर.

***************************************

गृहस्थ : काय रे, तुझी आई कशी आहे?

मुलगा : बरी आहे.

गृहस्थ : बहिण कशी आहे?

मुलगा : बरी आहे.

गृहस्थ : अच्छा, मग बाबा तर बरेच असतील?

मुलगा : नाही. बाबा एकच.

***************************************

एकदा विना आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये सामोसा खात असतात.

काव्या : अगं विना, तू सामोस्यामधील भाजीच का खात आहेस?

विना : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.

***************************************

मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते

आणि लिहिले होते एक्स्चेज ऑफर.

राम बराच वेळ ते बघत होता.. ते बघून काकु ओरडल्या

चला ऑफर फक्त मिक्सरची आहे.

***************************************

बाबा : काल रात्री कुठे होतास?

मुलगा : मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.

बाबा : रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा.

मुलगा : काय ?

बाबा : तुला नौकरी लागुन चार वर्ष झाली बेवड्या.

***************************************

बायको : देवा, जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळू दे.

नवरा : अरे वा ! इतका आवडतो मी तुला ?

बायको : नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार ?

नवीन माणसाला परत कोण शिकवणार?

***************************************

सुनबाई: सासूबाई कॅडबरी खाणार का ?

सासूबाई: नको बाई, मला कुठे “सात समुंदर ” वर नाचता येतंय.

***************************************

डॉक्टर: घाबरू नका देशपांडे, खूप छोटं ऑपरेशन आहे.

पेशंट: थँक यू डॉक्टर, पण माझं नाव देशपांडे नाही.

डॉक्टर: मला माहीत आहे. देशपांडे माझं नाव आहे.

***************************************

गंपू : तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना? मग पत्र का पाठवलंस?

झंपू : आधी फोनच केला होता. पण एक बाई सारखी सांगत होती,

‘प्लीज ट्राय लेटर’!

***************************************

बायको : काय हो, इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?

नवरा : बहिणीशी

बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?

नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय.

बिचारा नवरा तेव्हापासून बायकोकडे मोबाईल मागतोय.

***************************************

शिक्षक : पृथ्वीवरचा सर्वात जुना प्राणी कोणता ?

विद्यार्थी : झेब्रा.

तो अजून ब्लॅक अँड व्हाईट आहे.

***************************************

दुकानदार : बोला साहेब काय पाहिजे?

ग्राहक : होणाऱ्या बायकोच्या कुत्र्या साठी केक पाहिजे,

दुकानदार : इथेच खाणार कि पॅक करून देऊ !

***************************************

२ मिनिटांसाठी दुधाला गॅस वर सोडलं

तर दूध पण उपदेश देऊन रहातंय

मुझे छोड़कर जो तुम जाओगे

बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे.

***************************************

लाईफ पार्टनर असो किंवा नसो पण

पाणीपुरी पार्टनर असलाच पाहिजे.

***************************************

नवरा बायको एकत्र चहा पिताना बघूनच

वाघ बकरी हे नाव कंपनीला सुचलं असावं.

***************************************

लग्न पत्रिकेमध्ये स्पष्टपणे नमूद

केले होते.

कृपया दारू पिणाऱ्यांनी येऊ नये

नवरदेवच आला नाही.

***************************************

मराठी हास्य विनोद

एक पुणेरी पाटी

मिठाई दुकानावरील पाटी

इथे तुम्हाला तुमच्या मेहुणीपेक्षा गोड आणि बायकोपेक्षा

तिखट पदार्थ मिळतील.

***************************************

डॉक्टर म्हणाले, ३-४ महिने नॉनव्हेज आणि दारू बंद करा,

वाईट वाटलं, पण इलाज नव्हता ,शेवटी मनाची

तयारी केली आणि डॉक्टर बदलला.

***************************************

आज ती म्हणाली,

मला स्वयंपाक येत नाही

मी म्हणालो,

लग्नाआधी का नाही सांगितलं ?

तरी ती म्हणाली तुला सरप्राईज द्यायचं होतं !

***************************************

समोरच्या अपार्टमेंटमधील

ती पाच मिनिट हात हलवत होती.

मग मी पण हात केला,

तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला,

व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय.

***************************************

आयुष्य खूप Boring झालं देवा,

उचल एकदाच..आणि टाक नेऊन गोव्याच्या बीचवर.

***************************************

ती मला हे सांगून सोडून गेली,

कि मला दुसरा भेटला आहे.

अरे त्या वेडीला कोण समजावणार

तो दुसरा अकाउंट पण माझाच आहे.

***************************************

पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे,

तर.

सासू आणि सुनेची जुळली पाहिजे,

संसार सुखाचाच होईल !

मुलगा कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतो..

बिच्चारा !

***************************************

खुशाली विचारायचा काळ गेला आता,

माणूस Online दिसला कि समजायचं,

सर्व काही ठीक आहे.

परमेश्वर सर्वांना Online ठेवो.

***************************************

मी: Hey Dad Wassup??

पप्पा: मराठीत बोलायला लाज वाटते का रे?

मी: Ok ठीक आहे.

मला जरा गरमकेंद्रबिंदू देता का?

पप्पा: हे काय असतं आता?

मी: Hotspot हो पप्पा.

पप्पानी Spot Hot होईपर्यंत धुतला.

***************************************

वडील: इतका मार खातोस रोज,

तुला राग येत नाही का रे माझा ?

मुलगा: येतो ना !

वडील: मग काय करतोस तू राग आल्यावर ?

मुलगा: मी संडास घासतो !

वडील: संडास घासून राग कसा काय शांत होतो ?

मी संडास तुमच्या टूथब्रश ने घासतो !

मुलाला संडासात घालून मारला.

***************************************

मराठी विनोद नवरा बायको

एक पोलीस पोलीस स्टेशन मध्ये फोन करतो,

पोलीस स्टेशन : हा बोला.

पोलीस: साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय,

एक खुन झालाय.. इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला,

पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणुन गोळी घातली.

पोलीस स्टेशन : मग तुम्ही तिला अटक केली

का नाही ?

पोलीस: नाही साहेब,

फरशी अजून वाळली नाही !

***************************************

आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली..

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी संसाराकडे वळाली..

मैत्रिणीने मला विचारलं, “मुलं बाळं काय?”

मी म्हणालो “हो दोन आहेत.

पहिलीला एक अन दुसरीला एक.”

मैत्रीण जागेवर बेशुद्ध!!

परत नीट वाचा !

***************************************

एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं.

ती भडकली,

तिने त्याला धू धू धुतला..

अगदी लोळवला.

तो कपडे झटकत उठला.

आणि म्हणाला.

तर मग मी नाही समजू का.?

***************************************

गण्या बसस्टॉपवर उभा होता,

एक मोटर सायकल स्वार,

त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले,

” लिफ्ट हवी आहे का?”

‘गण्या : ”नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!

***************************************

एकदा एक ‘पाटील’ आंघोळ करताना शाम्पू,

डोक्याला आणि खांद्याला लावत होता..

बायको: अव्ह.. हे काय करताय?

शाम्पू डोक्याला लावायचा असतू,

पाटील: अगं येडे.

हा काय, साधा शाम्पू नाही

हा तर Head & Shoulder आहे.!

***************************************

आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजलं की.

जेवण चांगलं असेल तर प्रेमाचा पण विसर पडतो,

पुरी दे रे अजून.

***************************************

बाबा: झम्पू जरा तुझा मोबाईल दे रे,

झम्प्या : एक मिनिट हा बाबा स्विच ऑन करून देतो..

झम्प्या Item चे फोटो उडवतो,

सर्व मुलींचे मेसेज आणि Number Delete करतो,

आलेले Call Delete करतो,

Memory Card Format मारतो,

बाबा: आभारी आहे. घड्याळ बंद पडले ना,

फक्त Time बघायचा होता.

***************************************

मी रात्री उशिरा घरात शिरलो

आणि बेडवर पाठ टेकताच.

ती म्हणाली, दारू पिऊन आलात ना ?

मी म्हणालो, खरं आहे.

पण तू कसे काय ओळखलेस ?

ती हसुन म्हणाली, तुमचे घर बाजूचे आहे.

***************************************

दुकानदार : बोला साहेब काय पाहिजे?

ग्राहक : होणाऱ्या बायकोच्या कुत्र्या साठी केक पाहिजे,

दुकानदार : इथेच खाणार कि पॅक करून देऊ !

***************************************

मी एका हॉटेल मध्ये एकटा बसलो होतो,

तिथे एका मुलीने जवळ येऊन विचारले,

‘तू सिंगल आहेस का?’

मी मनातल्या मनात खुश होऊन बोललो, ‘हो ’

माझ्या समोरची रिकामी खुर्ची

घेऊन गेली ना राव ती !

***************************************

गणू: पप्पा जरा कारची चावी दया ना कॉलेज ला जायचंय..

पप्पा: कॉलेज ला जायला कारची काय गरज?

गणू: काय नाय पप्पा, २० लाखाच्या गाडीतून जाऊन जरा हवा करायचीय..

पप्पा: हे घे २० रुपय, ५० लाखाच्या बसमधून जा,

म्हणजे वादळ येईल वादळ.

***************************************

बायको: तुम्ही सारखं सारखं माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता?

जे काय बोलायचं ते मला बोला..

नवरा: हे बघ टीव्ही खराब होतो, तेव्हा आपण टीव्ही ला काही बोलतो का?

शिव्या तर कंपनीलाच देतो ना..

***************************************

ह्याला म्हणतात बदला!

मी तिला ३-४ वेळा फोन केला पण तिने उचलला नाही..

नंतर तिला एकच Message केला,

“Balance” आला का?

१००० ला १००० Full Talk Time!

तिने आत्तापर्यंत २० वेळा फोन केला पण मी उचलला नाही..

चुकीला माफी नाही.

***************************************

मुलगा : आय लव्ह यू

मुलगी : नाही मी दुसऱ्यावर प्रेम करते,

मुलगा फुल्ल नाराज होतो.

आणि अचानक काही वेळाने जोरात पळू लागतो.

मुलगी विचारते काय झालं रे?

मुलगा : थांब तुझ्या आईला जाऊन सांगतो.

मुलगी : इकडं ये कुत्र्या, आय लव्ह यू टू.

***************************************

पत्रकार: कल शाम आपने क्या किया?

रामदास आठवले: पोहे

पत्रकार: अरे वा! हमें भी खिलाओ कभी.

पोहे तो हमें भी पसंद है.

रामदास आठवले: अरे बाबा, वो वाले पोहे नही.

कल हम स्विमिंग पूल मे पोहे..

पहले पाणी मे “शिरा” और बाद मे “पोहा”

इतना आनंद आया की उसको कुछ “उपमा” च नही.

***************************************

शेजारच्या आजी सारख्या घरात जायच्या,

बाहेर यायच्या, मला राहवेना,

म्हणून विचारले: आजी काय प्रॉब्लेम आहे?

सारख्या घरात जाताय, बाहेर येताय,

सर्व ठीक आहे ना?

आजी म्हणाल्या: अरे बाबा,

माझी सून योग शिकतिया TV वर बघून,

आन त्यो रामदेवबाबा म्हणतो,

सास को अंदर लो,

Sa सास को बाहर निकालो!

सास को अंदर लो,

Sa सास को बाहेर निकालो!

मेल्याने मलाच नको नको करून ठेवलंय.

***************************************

उंदराची टोळी तलवार घेऊन धावत होती,

रस्त्यात वाघ विचारतो अरे का धावता?

उंदीर चल सरक बे तिकडे,

हत्तीच्या आयटमला कुणीतरी प्रपोस केला,

अन नाव आमच्यावर आले.

***************************************

किती बरे झाले असते,

जर प्रेमाचा पण इन्शुरन्स असता,

प्रेम करण्या अगोदर प्रीमियम भरला असता,

प्रेमात मुलीची सोबत मिळाली तर ठीक,

नाहीतर त्या मुलीवर केलेल्या खर्चाचा

क्लेम तर मिळाला असता.

***************************************

एकदा तरूण मुलांचा ग्रुप दिंडीला निघतो,

गूरूजी कानमंत्र सांगतात ?

रस्त्यात जर सुंदर मुलगी दिसली

तर फक्त हरि ओम ! म्हणायचं.

म्हणजे लक्ष विचलित होणार नाही.

थोडे अंतर चालल्यावर एक जन

!! हरि ओम !! म्हणतो..

लगेच बाकी सारे एका सूरात

म्हणतात ?

कुठंय कुठंय !

***************************************

एक मुलगा देवाला विचारतो,

“तिला गुलाबाचं फूल का आवडतं ?

ते तर एका दिवसात मरून जातं !

मग तिला मी का आवडत नाही ?

मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो”!

देव उत्तर देतात,

भारी रे ! एक नंबर !

Whatsapp वर टाक !

***************************************

नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील?

बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल

तु खुश मी पण खुश.

नवरा: २० रुपयांची लागली आहे,

हे घे १० रूपये आणि चल निघ.

***************************************

एका मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मॅसेज सेंट केला,

आपलं लग्न होवू शकत नाही कारण माझं

लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले आहे..

मुलगा मॅसेज वाचुन खुप दुःखी होतो आणि रडायला लागतो..

२ मिनिटांनंतर त्या मुलाला मॅसेज येतो,

सॅारी, सॅारी! चुकून तुम्हाला हा मॅसेज सेंट झाला !

***************************************

वडील: अरे, एक काळ असा होता,

की मी पाच रुपयांत किराणासामान दूध, पाव

आणि अंडी घेऊन यायचो.

मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !

***************************************

बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता,

तेव्हा मला ‘परी’ म्हणता..

बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता..

मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात.

नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय,

“सिधी बात नो बकवास”

***************************************

आई : इतक्या रात्रीपर्यंत कुठे भटकत होतास?

गंपू: पिक्चर बघायला गेलो होतो,

आई: कोणता?

गंपू: माँ की ममता.

आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ,

गंपू: कोणता?

आई: बाप का कहर.

***************************************

एक मध्यम वयाचा माणूस जिम मध्ये

जातो आणि तिथल्या ट्रेनर ला विचारतो,

माणूस: मला एका सुंदर मुलीला पटवायचे आहे

तर, मी कोणती मशीन वापरू?

ट्रेनर: सर तुम्ही ए.टी.एम. मशिनच वापरा !

***************************************

धोनीचा सूट 4 कोटी 31 लाखाला विकला गेलाय,,

आणि आमच्या घरच्यांनी माझ्या 3 पॅन्ट आणि 2 शर्टच्या बदल्यात 1 तांब्या घेतलाय.

***************************************

पुणेकर :- हॅलो, फ्लिपकार्टमधून बोलताय कां आपण??

फ्लिपकार्ट :- यस सर!!

पुणेकर :- आजच माझ्या पत्नीची डिलीव्हरी झाली आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय!!

फ्लिपकार्ट :- अभिनंदन!! आनंदाची गोष्ट आहे ही पण मी आपली काय सेवा करू शकतो??

पुणेकर :- विशेष काही नाही, मी माझ्या बॅंकेच्या खात्याचा नंबर देतो तो लिहून घ्या आणि त्यात कॅश जमा करा!!

 फ्लिपकार्ट 😧:- हॅलो सर, आपला काही तरी गोंधळ झालेला दिसतोय. हे फ्लिपकार्ट आहे. कॅश कशासाठी भरायची आम्ही??

पुणेकर :- वाह रे पठ्ठे!! मग डेक्कनवर एवढे मोठ्ठाले बोर्ड लावलेत “कॅश ऑन डिलीव्हरी” ते कशासाठी??

***************************************

कंस,व्यास आणि कर्ण हे तिघेजण महाभारतातून भूमितीत गेले की, भूमितीतून महाभारतात आले? …. पण…

एक मात्र खरं की भूमितीतले मार्क कळले की घरी महाभारत घडायचं.🤣😁

***************************************

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *