केसांचे आरोग्य & केसगळती


हा लेख इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा: Healthy Hair & Hair Loss

टायटल पिक्चरमध्ये दिसतोय तो माझ्या केसांचा 😀 1984-85 मध्ये काढलेला फोटो आहे. त्यावेळी माझे केस सुंदर, मऊ, मजबूत, काळेशार आणि घनदाट होते. हार्मोनल बदलांमुळे प्रेग्नेंसीमध्ये आणि बाळाच्या जन्मादरम्यान केस गळतात असे ऐकले होते. पण माझ्या दोनही प्रेग्नन्सीमध्ये तसे काही झाले नाही. हुश्श वाटले. पुढे अमेरिकेत आल्यानंतर माझे केस गळू लागले. पाणी आणि हवामानातील बदलामुळे असावे कदाचित. खूप काही गळत नव्हते. त्यामुळे जास्त काळजी वाटली नाही. अलीकडे मात्र खूप प्रमाणात केस गळती सुरू झाली. मला खूप काळजी वाटली. बहुतेक मेनोपॉज/रजोनिवृत्तीमूळे असेल. मी केस गळतीवर उपाय शोधायला सुरुवात केली. त्यात मला काही घरगुती उपाय सापडले. मी ठरवले की तुमच्या सोबत हे उपाय शेअर करावेत. मग विचार केला की केसांबद्दल लिहीतच आहे तर केसांच्या आरोग्याबद्दल काही मुलभूत गोष्टी पण सांगू या. केस गळणे ही आता सामान्य समस्या झाली आहे. त्यावर शेकडो उपाय पण आहेत. ह्या लेखाच्या शेवटी मी ट्राय केलेले उपाय तुम्हाला सांगणार आहे.

 • मानवांसाठी केसांचे खूप सामाजिक महत्त्व आहे. सुंदर केसांमुळे स्त्रीचे सौंदर्य आणि पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलून दिसते.
 • केराटिन नावाच्या एका प्रोटीनपासून केस बनतात.
 • केसांची वाढ हेअर फॉलिकल/केस बीज कोशांमध्ये होते.
 • हेअर बल्ब मधून रक्त पुरवठा होतो आणि केसांची वाढ होते.
 • वयोमानाप्रमाणे केसांच्या वाढीवर आणि रचनेवर हार्मोन्सचा प्रभाव असतो.
 • अनुवंशिकतेने नुसार केसांची वाढ, रंग, पोत ठरत असते.
 • दर महिन्याला सरासरी 1 सेंटीमीटर केसांची वाढ होते
 • हेअर फॉलिकल मध्ये मेलानिन तयार होतो आणि त्यानुसार केसांचा रंग ठरतो. मेलानिन तयार करणाऱ्या पेशी हळू हळू मरू लागतात आणि केस पांढरे होतात.
 • दररोज आपण 50 ते 100 केस गमावतो.
 • एका केसाचे आयुष्य पाच वर्षांचे असते.
 • उबदार हवामानात केस जलद वाढतात.
 • केस कापण्याचा त्याच्या वाढीवर काही परिणाम होत नाही.

सुंदर केस असणे हे अनुवंशिकता आणि उत्तम आहारावर अवलंबून असते. 

माझ्या मुलीचे केस

निरोगी केसांसाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार न घेतल्यामुळे केसांच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. म्हणून समतोल आहार घेणे महत्वाचे आहे. आहारात प्रथिने, फळे, भाज्या, धान्य आणि  हेल्दी फॅट्स असणे आवश्यक आहे.

 • ओमेगा -3 फॅटी ॲसिडस, प्रथिने, व्हिटॅमिन बी 12 आणि लोह डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा आणि केसांचा निस्तेजपणा रोखतात.
 • गडद हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी चे प्रमाण जास्त असते, जे  केसांना नैसर्गिक कंडिशनर प्रदान करते. यात लोह आणि कॅल्शियम देखील असते.
 • बीन्स आणि डाळीमध्ये प्रथिने, लोह, जस्त आणि बायोटिन असते. बायोटिनच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात आणि गळतात. यकृत, अंडी, सोया आणि यीस्टमध्ये बायोटिन असते.
 • ड्रायफ्रूट्स आणि नट्स मध्ये सेलेनियम असते. ते डोक्याचा त्वचेसाठी महत्वाचे असते.
 • तृणधान्ये, अंडी आणि यकृत मध्ये व्हिटॅमिन बी 6 असते जे डोक्यातील कोंडा टाळण्यास मदत करते.
 • मासे, अंडी,  चिकन आणि दुधातून व्हिटॅमिन बी 12  मिळू शकते. केस गळती थांबण्यासाठी ह्याची गरज असते.
 •  हेअर फॉलिकल साठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई ची आवश्यकता असते.
 • बीटा- कॅरोटीन (जे व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते) केसांच्या वाढीसाठी महत्वाचे आहे.
 • झिंक (मांस, अंडी आणि सीफूड), कॅल्शियम (डेअरी उत्पादने), आयोडीन, सल्फर, फॅटी ॲसिडस (फिश ऑइल, फ्लेक्ससीड/जवस, अक्रोड) सुद्धा केसांच्या वाढीसाठी उपयोगी आहेत.
 • पालक आणि ब्रोकोली मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असते.
 •  पेकन, अक्रोड, काजू आणि बदामांमध्ये जस्त (झिंक) असते.
 • गाजर हे व्हिटॅमिन ए चे उत्कृष्ट स्रोत आहे.

केसांच्या आरोग्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

पुरेशी झोप घेणे महत्वाची असते.

भावनिक ताणतणावामुळे केस गळती होते. तसेच अकाली केस पांढरे होतात.केस गळतीची कारणे: ऍनेमिया, अशक्तपणा, थायरॉईड समस्या (हायपोथायरॉईडीझम), डिप्रेशन (औदासिन्य), औषधांचे साइड इफेक्ट, क्रॅश डायट, चुकीचा आहार, पर्यावरण प्रदुषण, स्काल्प इन्फेक्शन, हेअर डाय, केसांचे ब्लीचिंग, शैम्पू / कंडिशनरचा अयोग्य वापर, हार्मोनल बदल (गर्भधारणा, मुलाचा जन्म, रजोनिवृत्ती).

मी ट्राय केलेल्या दोन घरगुती तेलाच्या रेसिपी देत आहे.

1. मेथ्या मोहरीचे तेल: मी केसांसाठी 500 मि.ली. ऑरगॅनिक मोहरीचे तेल विकत घेतले. काही लोक स्वयंपाकासाठी मोहरीचे तेल वापरतात. खाद्यतेल आणि केसांच्या तेलामध्ये काही फरक आहे का याची मला कल्पना नाही, परंतु तुम्ही केसांचे तेल खरेदी करा.

ह्या तेलात दोन मोठे चमचे मेथ्या घालून काळे होईपर्यंत उकळवले. थंड झाल्यावर, ते फिल्टर केले आणि ते परत बाटलीमध्ये भरून ठेवले. मी आदल्या रात्री केसांना तेलाचे मालिश करून दुसर्‍या दिवशी केस धुवून घेत आहे. काही प्रयोगानंतर असे दिसून आले की केस गळती कमी झाली आणि माझ्या केसांची पोत देखील खूप सुधारली.

जर तुम्हाला ह्या तेलाच्या चिकटपणाचा आणि वासाचा प्रॉब्लेम नसेल तर खोबरेल तेलाप्रमाणे ते केसात तसेच राहू देऊ शकता. जर तुम्हाला तसे आवडत नसेल तर केस धुण्याच्या आदल्या रात्री किंवा काही तासआधी हे तेल लावून मग केस धुता येतील.

2.जास्वंदाचे तेल: अलीकडेच सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून घरगुती केसासाठी तेल बनवले. त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. खोबरेल तेल, मेथी दाना, कढीपत्ता, जास्वंदाच्या वाळलेल्या पाकळ्या आणि कॅस्टर ओईल (एरंडेल तेल) इत्यादी साहित्य वापरले. साहित्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. पण लक्षात ठेवा एरंडेल तेल खूप चिकट असते, त्यामुळे त्याचे प्रमाण कमी ठेवावे.

 • कढीपत्ता मध्ये केसांसाठी पोषक तत्वे आणि प्रोटिन्स असतात जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात. तसेच केसांची गळती थांबवण्यासाठी उपयोगी असतात.
 • जास्वंदाच्या फुलांमध्ये अ आणि क जीवनसत्वे असतात जे केसांच्या वाढीसाठी तसेच केस काळे राहण्यासाठी उपयुक्त असतात.
 • एरंडेल तेल केसांना मजबुती आणते.
 • मेथ्या मुळे केसातला कोंडा कमी होतो, केसांना चमक मिळते आणि केस मजबूत होतात.

एका जाड बुडाच्या भांड्यात खोबरेल तेल घ्या. त्यात मेथ्या, कढीपत्ता आणि जास्वंदाची फुले टाका. हे मिश्रण मध्यम आचेवर पाच ते सहा मिनिटे शिजवा. कढीपत्ता आणि जास्वंद कुरकुरीत झाला की त्या मिश्रणात दोन ते तीन मोठे चमचे एरंडेल तेल टाका. आणि गॅस बंद करा. हे मिश्रण तसेच काही तासांसाठी झाकून ठेवा. त्यानंतर गाळणीने किंवा कपड्याने गाळून घ्या. प्लास्टिक किंवा काचेच्या डब्यात स्टोर करा.

इतर तेलांप्रमाणे आदल्या रात्री केसांना तेलाचे मालिश करा आणि दुसऱ्या दिवशी केस धुऊन घ्या. 

मी आशा करते की वाचकांना त्याचा फायदा होईल. तुम्ही ट्राय करा आणि मला जरूर कळवा. 🙂


10 Replies to “केसांचे आरोग्य & केसगळती”

 1. Yes savi I am also started oil application and stopped using shampoos … Instead I am using shikekai, ritha and amla powder..My hair has become dense and long with smooth and silky

 2. Recently I am having a lot of hair fall. I have thyroid and sjorgen syndrome. Is this a reason I am having so much hair fall?? But I will try that hair oil which u mentioned in the article.

  1. Underlying medical conditions can cause hair loss. Try this oil and see. Also, managing stress, getting enough sleep, good nutrition and physical activities are important. Let me know if this oil helps you 🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *