मागील एका वर्षापासून पूर्ण मानवजात कोरोनाच्या विळख्यात जखडून पडले आहे. त्यात आता भारतामध्ये दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. सगळीकडे निगेटिव्ह वातावरण तयार झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रसार आणि ओळखीच्या तसेच नातेवाईकांच्या मृत्यूने प्रत्येकाला वाटत आहे कि मलाही कोविड होणार आणि मी मरणार! त्यामुळे सगळीकडे भितीचे वातावरण पसरले आहे. सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तुम्ही फक्त मरण पावलेल्या लोकांचा आकडा पाहून धास्तावला आहात. कोविडमधून बरे झालेल्यांच्या भल्या मोठ्या आकड्याकडे कोणी लक्षच देत नाहीये.
आपल्याला माहीतच आहे की विषाणू (व्हायरस) चे म्युटेशन होणे हे नैसर्गिक असते. त्याप्रमाणेच कोरोना हा सुद्धा एक व्हायरस असल्यामुळे त्याचे पण म्युटेशन होत आहे. आता हे म्युटेशन म्हणजे काय? कोरोना व्हायरसवर स्पाईक प्रोटीन असतात. त्याच्या मदतीने कोरोना शरीरात प्रवेश करतो. प्रवेश करणे सोपे व्हावे म्हणून स्पाईक प्रोटीनमध्ये बदल घडवतो त्याला म्युटेशन म्हणतात. जसे पौराणिक कथेत एखादा राक्षस वेगवेगळी मायावी रूपे घेऊन त्रास देत असतो, त्याप्रमाणे हा विषाणू सुद्धा म्युटेशन करून आपल्याला आजारी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे म्युटेशनला घाबरून चालणार नाही. विषाणूवर मात करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे आपली प्रतिकार शक्ती (इम्युनिटी). म्हणून कोरोना नावाच्या ब्रह्मराक्षसाशी लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती उत्तम असली पाहिजे. उत्तम इम्युनिटीसाठी शारीरिक तसेच मानसिक आरोग्य राखले पाहिजे. जेव्हा एखाद्या गोष्टीची प्रचंड भीती वाटते तेव्हा त्याचा आपल्या इम्युनिटीवर विपरीत परिणाम होतो. भीतीला पळवून लावण्याचे सामर्थ्य आपल्या विचारात असते. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन जोपासून नकारात्मक विचार कमी करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आपली मानसिकता बदलणे हे पूर्णपणे आपल्या हातात असते.
न्यूज चॅनेल आणि सोशल मीडिया हे सतत भीती पसरवत आहेत. नवीन म्युटेशन बद्दलच्या हेडलाईन्स, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिविरचा काळा बाजार, प्रेतांच्या रांगा, बेड मिळत नाही म्हणून मृत्यू होणे आणि तत्सम बातम्यांमुळे प्रत्येकाच्या मनात भीती बसली आहे. असे वाटत आहे की कोरोना झाला म्हणजे मृत्यू निश्चित. व्हाट्सअपवर येणारे प्रत्येक फॉरवर्ड खरे समजून त्याचे पालन केले जात आहे. त्या फॉरवर्डमध्ये काही खरे पण असतील. पण आपल्याला जर कोणते खरे आणि कोणते खोटे कळत नसेल तर सगळ्याच फॉरवर्डकडे दुर्लक्ष केलेले बरे. व्हाट्सअपचा उपयोग सायन्स शिकण्यासाठी अजिबात करू नका. ते फक्त कम्युनिकेशन आणि एंटरटेनमेंटसाठी वापरा. आपल्या लोकांच्या संपर्कात रहा आणि एकमेकांचे मनोधैर्य वाढवा. जर कुणाला कोविड झाला असेल तर त्यात लपवून ठेवण्यासारखे काहीही नाही. त्या व्यक्तीकडे तुच्छतेेणे पाहणे हे अतिशय चुकीचे आहे. जे घडायचे आहे ते घडणार. ते आपण बदलू शकत नाही. पण आपली काळजी घेणे आपल्या हातात आहे. त्यामुळे घाबरून न जाता त्याच्याशी लढा देण्यासाठी तयार असावे. काळजी घेण्यासाठी असलेली पहिली स्टेप म्हणजे त्याबद्दलचे ज्ञान. ह्यापूर्वी मी कोरोना आणि आरोग्यविषयक सविस्तर लेख लिहिलेले आहेत. त्या लेखांचे लिंक त्या त्या ठिकाणी देत आहे. त्यामुळे तुम्हाला त्या विषयावर सविस्तर माहिती मिळवता येईल. (अरे बाबा कोरोना, आलास तसा जाशील ना?)
सर्वप्रथम कोरोना होऊ नये म्हणून काळजी घ्या, प्रिकौशन्स घेत राहा. कोरोना होऊ नये म्हणून घ्यायची काळजी:
- मास्क वापरणे.
- सोशल डिस्टंसिंग पाळणे.
- वीस सेकंद हात धुणे.
दुसरी गोष्ट: जमेल तेव्हा मिळेल ती लस घेणे. भारतात कोविशील्ड आणि कोवॅक्सिन आहेत आणि अमेरिकेत फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अंड जॉन्सन ह्या लसी उपलब्ध आहेत. लोकांमध्ये लसीबद्दल बरेच गैरसमज आहेत. साधारणतः कोणतीही लस विकसित करण्यासाठी बरीच वर्षे लागतात. त्यामानाने एका वर्षाच्या आत कोरोनाची लस तयार झाली, जे आपल्यासाठी एक वरदान आहे. त्याचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे. एकदा लस शरीरात गेल्यानंतर 14-15 दिवसात आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात आणि आपले शरीर कोरोनाशी लढण्यासाठी सिद्ध होते. पूर्ण लसीकरण (दोन्ही डोसेस) झालेल्या व्यक्तीला जरी कोरोना झाला तरी सिरीयस कोरोना होऊन व्हेंटिलेटरवर जाणे आणि मृत्युमुखी पडणे ह्यापासून 100% अभय मिळते. मग ती लस कुठलीही असो. जेव्हा असे म्हटले जाते की, एखादी लस 75% इफेक्टिव आहे, याचा अर्थ असा की, त्या व्यक्तीला व्हेंटिलेटर आणि मृत्यूपासून 100% प्रोटेक्शन आणि सौम्य प्रकारचा कोरोना होण्याचा 25% चान्स. म्हणून एखादी लस 75%, 82% किंवा 95% प्रभावी आहे हे पाहण्यापेक्षा उपलब्ध असलेली लस जमेल तेव्हा घेऊन टाका. लसींच्या साईड इफेक्टबद्दल डंका पिटवली जात आहे. ताप येणे, डोके दुखणे, थकवा येणे यासारख्या क्षुल्लक साईड इफेक्टच्या बदल्यात व्हेंटिलेटर आणि मृत्यूपासून 100% प्रोटेक्शन मिळणार असेल तर तुम्हीच विचार करा की लस घ्यायची की नाही! कोविड झालेल्या लोकांनी त्यांची लक्षणे नाहीसे झाल्यानंतर आणि आयसोलेशन संपल्याबरोबर लस घेऊ शकतात. त्यांना लस घेण्याआधी कोविड टेस्ट करायची गरज नाही.
समजा प्रिकौशन्स घेऊनही आणि लस घेऊनही जर तुम्हाला कोविड झाला तर काय करावे?
असिम्प्टोमॅटिक कोविड: जर कुणाला लक्षणे नसतील (असिम्प्टोमॅटिक) पण कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल तर त्या व्यक्तीने स्वतःला होम क्वारंटाईन करून घ्यावे. जेणेकरून त्याच्या मार्फत इतरांना कोविड होणार नाही. त्याला कोणत्याही औषधांची गरज नाही.
माईल्ड किंवा मॉडरेट कोविड: जर कुणाला माईल्ड किंवा मॉडरेट कोविड म्हणजे ताप येणे, अंग दुखणे, खूप थकवा येणे, मळमळ होणे, संडास लागणे, तोंडाची चव जाणे, वासाची संवेदनशीलता नष्ट होणे, सर्दी आणि खोकला होणे अशी लक्षणे असतील तर त्यांनी सुद्धा होम क्वारंटाईन करून घ्यावे. सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे तापीचे, सर्दीचे, डोके दुखीचे औषध पुरेसे आहे. त्याबरोबरच व्यवस्थित झोप, हायड्रेशन आणि रेस्ट घेतल्यास पूर्ण रिकव्हरी होऊ शकते. त्यांना इतर कोणत्या औषधांची किंवा सिटीस्कॅनची गरज नाही. त्याऐवजी सकस आहार घ्या, प्राणायाम करा. माझ्या नातेवाईक आणि फ्रेंड्सकडून कळाले तसेच सोशल मीडियावरती सर्क्युलेट होत असताना पाहिले की कोणाला कोविड झाला की त्याला औषधांची भली मोठी लिस्ट दिली जाते. त्यात आईवरमेक्टीन, डॉक्सीसायक्लिन,अझिथ्रोमायसिन, विटामिन सी, झिंक, ऍसिडिटीच्या गोळ्या असतात. काही लोकांनी तर कोविड होण्याआधीच प्रिव्हेंटिव्ह/ प्रोफीलॅक्सिस म्हणून घेतलेले ही ऐकले आहे. हा सगळा औषधांचा गैरवापर आहे. तो थांबला पाहिजे. तसेच सगळ्यांना सिटीस्कॅनचे प्रिस्क्रिप्शन दिले जात आहे. मग सिटीस्कॅनसाठी भल्यामोठ्या रांगा लागलेल्या आहेत. ह्या पेशंट्सना सिटीस्कॅनची अजिबात गरज नसते. मग स्कोरबद्दल चर्चा सुरू होते. ह्या सगळ्या गैरवापरामुळे लोकांमध्ये भीती वाढत आहे, पैशाचा आणि औषधांचा अपव्यय होतो आहे, औषधांचे साइड इफेक्ट आणि सिटीस्कॅनचे रेडिएशन असा तोटा होत आहे आणि रांगेत उभे राहून/गर्दी करून कोविडचा प्रसार वाढत आहे.
सीव्हिअर कोविड: चेस्ट पेन, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर पल्सऑक्सीमिटरने ऑक्सिजन लेवल चेक करा. ते 95 च्या वर असले पाहिजे. जर ते त्यापेक्षा कमी असेल तर घरच्या घरी प्रोनल व्हेंटिलेशन करू शकता. यामध्ये छाती खाली आणि पायाखाली अशा दोन उशा घेऊन पालथे झोपायचे. ह्या पोझिशनमध्ये एक मिनिट झाल्यावर पुन्हा ऑक्सीजन लेवल चेक करा. ते नक्की वर आलेले असेल. दिवसातून आठ ते दहा वेळेस करू शकता. जर ऑक्सिजन लेवल वर न येता कमी कमी होत असेल तर मात्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणे आवश्यक असते. घाबरू नका. हॉस्पिटल मध्ये ऍडमिशन म्हणजे व्हेंटिलेटर आणि मरण असे नव्हे. केवळ भीतीमुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन पेशंट सिरीयस होत आहेत आणि काहीजण हार्ट अटॅकने मरत आहेत. तसेच रेमडीसीविर मेडिसिनचा काळाबाजार सुरू आहे. प्रत्येकाला रेमडीसीविरची गरज आहे असे नाही. तसेच ते कुणाला मृत्यूच्या दाढेतून परत आणणारे औषध नाही. ऑक्सिजन लेवल नॉर्मल असणाऱ्यांना त्याचा काही फायदा नसतो. ऑक्सिजन लेवल कमी असणाऱ्या काही विशिष्ट पेशंटमध्ये त्याचा फायदा होतो. तुम्हाला ट्रीटमेंट देणारे डॉक्टर ठरवतील. तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही.
सध्याच्या परिस्थितीत कोरोना व्हायरसपेक्षा मोठा राक्षस म्हणजे भीती होय. मनात नकारात्मक विचार आल्यास झटकून देण्याचा प्रयत्न करा. मनाला नकारात्मक विचारापासून परावृत्त करण्यासाठी तुम्हाला आवडेल ते आणि जमेल ते करा. मनाला कुठल्यातरी चांगल्या कामात गुंतवा. वाचन करा. गाणी ऐका. जोक्स वाचा/पहा (हास्य-विनोद..कोरोना सोबत). मेडिटेशन करा. प्राणायाम करा. सोशल मीडियाचा लिमिटेड आणि योग्य असा वापर करा. न्यूज चॅनेल पासून दूर रहा. सकस आहार घ्या. भरपूर पाणी प्या. मंत्र पठण करा. आरोग्यदायी झोप घ्या. शारीरिक व्यायाम करा. सकारात्मक विचारांना प्रेरणा द्या. आपल्या सगळ्यांना ह्या जगातून कधी ना कधी एक्झिट घ्यायची आहे. ते चुकणार नाही. मग त्याची भीती का बाळगायची? प्रत्येक क्षण आनंदाने कसा घालवता येईल याचा विचार करा. जीवन म्हटले की त्यात प्रॉब्लेम्स येणारच. त्याला न घाबरता, सामोरे जाऊन फाईट करायची ताकद असली पाहिजे. नाहीतर भित्यापाठी ब्रह्मराक्षस आहेच!
टेक होम मेसेज:
- सकस आहार घ्या. त्यात सगळ्या प्रकारच्या, भाज्या, फळे, धान्ये (गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, सातू), कडधान्ये (सगळ्या प्रकारच्या डाळी, मोड आलेली मूग-मटकी), खडे मसाले, लसूण, अद्रक, हिंग असा समावेश करा. गरम आणि ताजे अन्न खा. चहा-कॉफी २ ते ३ कपापेक्षा जास्त घेऊ नका. पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा: समतोल आहार
- जर तुम्ही निरोगी आहात आणि सकस आहार घेत असाल तर तुम्हाला कोणतेही व्हिटॅमिन (व्हिटॅमिन डी सोडून) घ्यायची आवश्यकता नाही. अन्न पदार्थातून मिळालेले नैसर्गिक प्रोटिन्स, कार्ब्स, हेल्थी फॅट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स केव्हाही चांगले. त्यामुळे तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा: जीवनसत्त्वे आणि खनिजे
- सकाळी कोमट पाणी + लिंबू आणि आवडत असेल तर मध घ्या.
- आदल्या दिवशी भिजत घातलेले (२४ किंवा १२ तास) १० बदाम चावून खा.
- भरपूर पाणी प्या (साधारणतः २.५ ते ३.५ लिटर). पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा: पाणी म्हणजे जीवन
- नियमित शारीरिक व्यायाम करा (आठवड्यात १५० मिनिटे किंवा आठवड्यातून ५ दिवस दररोज ३० मिनिटे). पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा: व्यायामाचे तंत्र
- मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. रोज योगा-मेडिटेशन करा. पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा: ब्रेन पॉवर (मानसिक आरोग्य)
- सोशल मीडिया पासून जरा लांबच राहा.
- मोबाईलचा अति वापर टाळा. पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा: स्क्रीन टाइम: शाप की वरदान?
- दररोज ७-८ तासाची आरोग्यदायी झोप घ्या. पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा: आरोग्यदायी झोप
- कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक असलेली सगळी काळजी घ्या: हॅन्ड वॉशिंग, मास्कचा वापर, सोशल डिस्टेनसिंग, बाहेरून आणलेल्या सामानाचे सॅनिटायझेशन, गर्दी टाळणे. एवढे करूनही जर कोरोना संसर्ग झालाच तर त्याला सामोरे जाणे एवढेच आपल्या हातात आहे.
- कोरोनाशी लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती उत्तम असली पाहिजे. पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा:इ.. इम्युनीटीचा
शेवटी एवढेच सांगते कि काळजी घ्या पण काळजी करू नका. काळजी केल्यामुळे तुमचे नुकसानच होईल. म्हणून काळजी घेण्यातच शहाणपणा आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी तीन तत्वे आवश्यक आहेत:
- प्रिकौशन्स घेत राहणे
- लस घेणे
- सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे!
Very nice Savi! Much needed article!
Thank you, Shilpa!
Very Nice……..In the current situation of corona, This article helps to build the confidence and positive attitude amongst the people.
Thank you, Piyush!
सध्या सगळे “भय इथले संपत नाही ” mode मधे आहेत & This article is like vaccine dose during this pandemic peak period…
Thank you, Ruta!
Hi Savi,very nice article .
Thank you, Sushama!
Nice that you shared links to ur previous articles.
Thanks savi.
Thank you, Gopal!
Ekdam borobar …aaple bhaych aaplyala kamjor karte…..khup chhan lekh tai
Thank you, Shubhangi!
खूप उपयुक्त आणि सामान्य जनमानसाला कळेल असे लिहीले आहेस !
Thank you, Sujata!
v .nice article for + vity in pandemic situation….article gives us booster dose for mental situation of corona fear…bhay ithle sampat nahi…pn article ne manatil bhiti barich dur keli.. v manat sakartmaktaaalu … khup chan article savi….grt….ya period madhe khup useful article….
Thank you, Seema!
Very nice article Savitra.I’m Dr Uppalwar,basically from Degloor and practicing Anaesthesiologist inNashik. Thank you again.
Thank you, Dr Uppalwar. Nice to connect and happy to see that you are from Degloor :). I wrote few articles related to anesthesia and patient stories during my anesthesia practice. Feel free to check them out 🙂
Thanks for sharing very valuable information.
Thank you, Pratiksha!