ती मी नव्हेच !


मेंदू हा आपल्या शरीराचा एक दृश्य भाग आहे. याउलट मन आपल्याला दिसत नाही. थोडक्यात सांगायचे तर मेंदू म्हणजे हार्डवेअर आणि मन म्हणजे सॉफ्टवेअर. मेंदूचे विकार/न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर्स हे न्यूरोलॉजिस्ट ट्रीट करतात तर मनोविकार हे सायकॅट्रिस्ट ट्रीट करतात. ह्या व्यतिरिक्त आणखी एक ग्रुप आहे ज्याला न्यूरो-साइक डिसऑर्डर्स म्हणतात.

असे कंडिशन्स कधीकधी गोंधळून टाकणारे असतात. त्यापैकी एक आहे डिपर्सनलायझेशन म्हणजेच “आऊट ऑफ बॉडी” चा अनुभव. असे वाटते की हे शरीर माझे नाही. असा अनुभव बऱ्याचश्या सायकॅट्रिक कंडिशन्समध्ये येतो, पण काही केसेस मध्ये त्यामागे न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर असू शकतो, ज्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. ‘ती मी नव्हेच’ ही माझ्या एका पेशंटची स्टोरी आहे, जिला आऊट ऑफ बॉडी चा वारंवार अनुभव यायचा आणि जणू काही ती म्हणायची कि, ती जेसिका मी नव्हेच! 

जेसिका नावाची पंधरा वर्षाची एक अमेरिकन तरुणी. एकदा ती तिच्या आई आणि लहान भावासोबत डिस्ने-लँडला गेली. ते एका राईड साठी रांगेत उभे होते. अचानक जेसिका तिच्या आईला म्हणाली, मॉम, मी इथे खरीच उभी आहे का? लहान भाऊ खो खो हसत सुटला. म्हणाला ताईला वेड लागले. आई पण हसू लागली. काही दिवसांनी पुन्हा एकदा तिने आईला विचारले की, ही मीच आहे का? आईला वाटले कि ती गम्मत करत आहे. तिने तिच्या डोक्यावर टपली मारली आणि हसत हसत किचनमध्ये निघून गेली. परत काही दिवसांनी पुन्हा तिने आईला विचारले की, मी आत्ता तुझ्यासमोर खरोखर उभी आहे का? असे जेव्हा चौथ्यांदा घडले तेव्हा मात्र आईला काळजी वाटायला लागली. तिच्या लक्षात आले की जेसिका थट्टा करत नाहीये. तिला काहीतरी होत आहे. आईने लगेच फोन करून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंटच्या दोन दिवस आधी पुन्हा तशी घटना घडली. सकाळची वेळ होती. जेसिका नाईट ड्रेस मध्ये होती. कॉफी घेण्यासाठी ती किचनमध्ये आली. कॉफीचा मग घेतला आणि खुर्चीवर जाऊन बसली. त्यानंतर तिने अचानक सेल्फी काढायला सुरुवात केली. सेल्फी काढण्यासारखे कपडे किंवा प्रसंग नव्हता. तिच्या आईला थोडेसे विचित्र वाटले. तिने तिला सेल्फी काढण्याचे कारण विचारले. त्यावर जेसिका म्हणाली, मला खात्री करून घ्यायची आहे कि मी ह्या खुर्चीवर बसलेली आहे. हे ऐकून आईच्या काळजाचा ठोका चुकला. तिची काळजी वाढली. तिला आता दोन दिवसही थांबायचे नव्हते. तिने फोन करून अर्जेन्ट अपॉईंटमेंट घेतली आणि जेसिकाला घेऊन तिच्या डॉक्टरांकडे गेली. तिच्या डॉक्टरांनी तिला सायकॅट्रिस्टकडे रेफर केले. सायकॅट्रिस्टने जेसिका आणि तिच्या आईला प्रश्न विचारले. आवश्यक असलेली तपासणी केली आणि सांगितले की तिला कसलाही मानसिक आजार नाही. त्यामुळे काळजी करायचे कारण नाही. असे सांगून त्या माय-लेकींना पाठवून दिले. आईने सुटकेचा श्वास सोडला. स्वतःच्या मनाची समजूत घातली की जेसिकाला काहीही झालेले नाही. तो सगळा तिच्या मनाचा खेळ होता. ह्या आजकालच्या मुली कधीकधी वेड्यासारखे वागतात. 

एक आठवडा होतो न होतो पुन्हा तसाच प्रसंग. आईला काय करावे सुचत नव्हते. आई तडक डॉक्टरांकडे गेली आणि म्हणाली की माझ्या मुलीला नेमके काय होत आहे? मला उत्तर हवे आहे. सायकॅट्रिस्टने सांगितले कि तिला काहीही झालेले नाही. मग तिला परत परत तसे का होत आहे? काही तरी कारण असले पाहिजे. आई तिथून हलायला तयार नव्हती. म्हणाली उत्तर मिळाल्याशिवाय मी जाणार नाही. डॉक्टर बुचकळ्यात पडले. त्यांच्या लक्षात आले की ही बाई सहजासहजी इथून जाणार नाही. मग ते स्वतः वरची बला टाळण्यासाठी म्हणाले, न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन ट्राय करा. अपॉइंटमेंट घेऊन जेसिकाला सोबत घेऊन आई माझ्या क्लिनिकमध्ये आली. म्हणाली, सॉरी डॉक्टर ! मला कळतंय की जेसिकाला न्यूरोलॉजीचा प्रॉब्लेम नाहीये. मी कदाचित तुमचा वेळ वाया घालवत आहे. पण मला काहीच सुचत नाहीये म्हणून मी इथे आले. असे म्हणून ती रडायला लागली. मी तिला डोळे पुसायला टिशू पेपर दिले. तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, शांत व्हा. तिला नेमकं काय होतंय मला सांगा. माझ्या परीने शक्य तेवढी मदत करेन. त्यांना थोडा धीर आला. डोळे पुसून त्यांनी जेसिकाचा प्रॉब्लेम विस्ताराने सांगायला सुरुवात केली. ते सगळं ऐकत असताना माझे विचारचक्र सुरु होते आणि ते एका डायग्नोसिसवर येऊन थांबले: टेम्पोरल लोब एपिलेप्सी.

मेंदू हा पूर्ण शरीराचे नियंत्रण करतो. त्याच्या वेगवेगळ्या भागाला वेगवेगळे कार्य नेमून दिलेले असतात. चित्रात दाखवल्याप्रमाणे कानाच्या वरच्या भागाला टेम्पोरल लोब असे म्हणतात. भावना, भाषा, ऐकणे आणि मेमरीचे नियंत्रण कक्ष टेम्पोरल लोब मध्ये असते. ह्या भागांमधून उद्भवणारे विकार बऱ्याचदा चॅलेंजिंग असतात. अपस्मार/ मिरगी येणे ज्याला इंग्लिश मध्ये एपिलेप्सी म्हणतात, ते मेंदूच्या कुठल्याही भागात उद्भवू शकतात. जर ते टेम्पोरल लोब मधून येत असतील तर बऱ्याच वेळेस त्यांची लक्षणे मनोविकारा सारखी असतात. त्यामुळे असे रुग्ण पहिल्यांदा सायकॅट्रिस्टकडे जातात. त्यानंतर न्यूरोलॉजिस्टकडे येऊन डायग्नोसिस होण्यास विलंब होऊ शकतो. जेसिकाची कहाणी ऐकून मला वाटले कि तीला टेम्पोरल लोब एपिलेप्सी असण्याची शक्यता आहे. मी तिच्या आईला त्याबद्दल तिला समजेल अशा भाषेत सांगितले आणि तिला दोन टेस्ट करायला सांगितल्या. एक म्हणजे ब्रेन एमआरआय/MRI आणि दुसरे म्हणजे ब्रेन वेव्ह स्टडी ज्याला ईईजी/EEG असे म्हणतात. ईईजी साठी डोक्यावर वीसेक इलेक्ट्रोड लावतात आणि ते कॉम्प्युटरला कनेक्ट करतात. मी तिच्यावर 48 तासांची ईईजी करवून घेतली. ब्रेन एमआरआय नॉर्मल आला. ईईजी मध्ये टेम्पोरल लोब एपिलेप्सी दिसून आली. डायग्नोसिस झाले. तिच्या आईच्या डोळ्यात जेसिकाचा प्रॉब्लेम सुरुवातीला गंभीरपणे न घेतल्याच्या अपराधाची भावना दिसत होती.

तिला मी एपिलेप्सीचे औषध सुरू केले. हळूहळू औषधाचा परिणाम दिसू लागला आणि तिची लक्षणे कमी होत होत बंद झाली. लक्षणे कमी किंवा बंद झाल्यानंतर सुद्धा एपिलेप्सीचे औषध एकूण दोन वर्ष सुरू ठेवावे लागते. दोन वर्षांनी पुन्हा ईईजी टेस्ट केली. ईईजी पूर्णपणे नॉर्मल झालेली होती. ती पूर्णपणे रिकवर झाली होती. तिचे औषध बंद करून तिला डिस्चार्ज करण्याची वेळ आली होती. जेसिका आणि तिच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद मनात साठवून घेत समाधानाने तिला घरी पाठवून दिले.


18 Replies to “ती मी नव्हेच !”

  1. great….amezing disease story of patient n your diagnosis n treatment is more successful…nd ot.recovery is great…v.nicr savi…. congratulations….you give this type of articles to us more n more….

  2. खुप छान झाले ग जेसीकाचे तुझ्यामुळे तूला यश आले खूप खूप अभिनंदन आम्हाला अभिमान आहे तुझा

  3. Your articles are always very much interesting to read. Most of the times topics are so different that we never have heard about it. Thanks a lot of sharing so much different information about human health.

  4. Excellent!👍
    Only treating somebody is ok but keeping the experience preserved in the form of stories can really help the next generation and people at large to have an idea of such happenings. Your efforts to write in methodical manner are really appreciated.

  5. You r a great doctor… you take every symptom of your pts seriously, think about it, go through literature/studies, come to diagnosis n then treat… that’s why your pts r satisfied n no wonder why they want Dr. Savitra Bandari only as a treating doctor… Proud of you…. Learning many different n interesting conditions- neuro & psychiatric also.. thanks to u… keep writing.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *