एक अनुभव….KOMTV चा!


३१ ऑक्टोबर, २०२० ला माझा KOMTV वर एक सेशन झाला. त्याचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. डॉ. सुधीर आणि डॉ. सीमाने माझे नाव अनिकेतच्या मार्फत KOMTV ला सुचवले. तिथून माझा KOMTV शी संबंध आला. महेशने मला फोन करून सगळी रूपरेषा सांगितली. माझ्या ब्लॉगमूळे त्यांना माझ्याबद्दल जाणून घेण्यास सोपे झाले. ऑक्टोबर महिना नवरात्रीचा असतो. स्त्री शक्तीला सन्मान देण्याचा असतो. त्यांनी एक भन्नाट कल्पना शोधून काढली. त्यांनी तो महिना ‘वूमन्स स्पेशल मंथ’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. कोमटी समाजातल्या नऊ वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांना ऑक्टोबरच्या प्रत्येक शनिवारी-रविवारी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सादर करण्याचे ठरवले.

एकदा वूमन्स स्पेशल असे म्हंटले कि गेस्ट-होस्ट-टेक्निकल टीम असे सगळे वूमन्सच असणार हे ओघाने आलेच.

सगळ्या फॉर्मॅलिटी आणि थोडे पेपरवर्क झाले आणि ३१ ऑक्टोबरची तारीख फिक्स झाली. जसजशी तारीख जवळ येत होती, तशी होस्ट आणि टेक्निकल टीमशी (गीतांजली आणि नरेंद्र) परिचय झाला. माझी होस्ट, रोहिणीशी चर्चा सुरु झाली. आम्ही दोघी ठरवत होतो कि नेमके कोणत्या टॉपिक वर सेशन करावे. आधी असे ठरले कि माझ्या पर्सनल म्हणजे जीवनप्रवास वगैरे वर करायचे. मग असे ठरले कि चाईल्ड न्यूरॉलॉजीवर बोलावे आणि त्याद्वारे लोकांना शक्य तेवढी माहिती द्यावी. माझी एवढीच अपेक्षा होती कि ह्या सेशनद्वारे लोकांना चार गोष्टी कळाव्यात आणि गैरसमज दूर व्हावेत. महिंद्राने (माझ्या मुलाने) छानसे टायटल सुचवले:  “Brain Problems in Children-An Essential Summary” 

खाली दिलेल्या व्हिडीओमध्ये गर्भामध्ये ब्रेन एका न्यूरल टयूब नावाच्या आकारातून कसे तयार होते ते दाखवले आहे.

गडबडीत पॉवर पॉईंट स्लाईड्स बनवल्या. मोजकेच पण सामान्य लोकांना समजेल अश्या पद्धतीने रचना केली. माझ्या हॉस्पिटलच्या वेब साईट साठी काढलेला फोटो कामी आला. दोन दिवस आधी ‘ड्राय रन टेस्टिंग’ म्हणजे कॅमेरा, बॅक ग्राउंड, एक्सपोजर, कनेक्शन्स इ. बाबींची टेस्टिंग झाली. मग फ्लायर तयार झाला आणि तो सोशल मीडिया वर झळकला. व्हाट्सअपच्या सगळ्या फॅमिली आणि फ्रेंड्स ग्रुप्स मध्ये शुभेच्छा आणि कौतुकांच्या मेसेजेसना पेव फुटले. “मैत्र जीवांचे” ह्या माझ्या MBBS च्या ग्रुपला माझा DP लावला गेला आणि “अभिमान आहे आम्हाला” असे ग्रुपचे नाव बदलल्या गेले. सगळ्यांचा उत्साह आणि अपेक्षा पाहून मनात थोडी भीती वाटली होती. कोणाचाही अपेक्षाभंग होऊ नये अशी मनोमन प्रार्थना केली.

हॉस्पिटलमध्ये भरपूर काम होते. इमरजन्सी केसेस मूळे सेशनच्या आधी ३-४ रात्री झोप व्यवस्थित झालेली नव्हती. त्यात आदल्या दिवशी आमच्या डिपार्टमेंट मध्ये हॅलोविनचा पॉट-लक होता. त्याची तयारी केली. मिटींग्स, लेक्चर आणि बिझी क्लिनिक संपवून घरी आले. त्यादिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. मग मसाला मिल्क आणि डिनर बनवून सरस्वती देवीची पूजा केली. इंडिया टाइम प्रमाणे ३१ ला संध्याकाळी ५ ला कार्यक्रम होता पण आमच्यासाठी ते शनिवारी/३१ ला सकाळी ७:३० ला सुरु होणार होते. पहाटे ५ चा अलार्म लावून झोपले. पण बराच वेळ झोप आली नाही. कशी बशी २-३ तासांची झोप झाली असेल. नवरा आणि मुलं सगळे ६ ला उठले आणि माझ्या मदतीला लागले. सगळ्यांच्या आयडिया एकत्रित कामी आल्या. सेटअप तयार झाला. एक्स्पर्ट मनिषाने (माझी मुलगी) हेयर स्टाईल केली. सकाळी ७:१५ ला वर्चुअल स्टुडिओत गेले आणि ७:३० च्या ठोक्याला लाईव्ह सेशन सुरु झाले. पहिल्या १० मिनिटानंतर मी एकदम रिलॅक्स झाले.

Brain Problems in Children – An Essential Summary (KOMTV Interview) Powerpoint

एक एक करत पॉवर पॉईंट स्लाईडस दाखवत ब्रेनची डेव्हलपमेंट, हेड शेप्स, हेड साईझ, हेल्मेट थेरपी, एपिलेप्सी, मायग्रेन (अर्धशिशी), ADHD, ऑटिज्म, कंकशन, सुपर ब्रेन योगा आणि हेल्थी लाईफ स्टाईल बद्दल माहिती देऊन झाली. दर्शकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन झाली. बघता बघता सव्वा तास झाला. होस्ट रोहिणीने तिच्या गोड आवाजात तिने तयार केलेल्या चार ओळी मला डेडिकेट केल्या आणि कार्यक्रमाची सांगता झाली:

स्त्रीत्वाचा अभिमान तू,

रणांगणात मर्दिनी तू,

शौर्याची तर गाथा तू,

हिरकणी तू…

सेशन संपले. हुश्श वाटले. काही वेळ टीम सोबत गप्पा झाल्या. तोपर्यंत मुलांनी आणि नवऱ्याने केक तयार ठेवला होता. मला सरप्राईझ देण्यासाठी. त्यानंतर अखंड फोन कॉल्स आणि मेसेजेसचा वर्षाव सुरु झाला. खरं सांगायचं तर मला एवढा रिस्पॉन्स अपेक्षित नव्हता. माझ्यापेक्षा मला जाणणाऱ्याना म्हणजे फॅमिली आणि फ्रेंड्सना माझ्याबद्दल जास्त खात्री होती. सगळ्यांनी भरभरून कौतुक केले आणि खूप शाबासकी दिली. ते पाहून माझे ही मन सुखावले. आई-बाबांच्या आठवणीने डोळ्याच्या कडा ओलावल्या. माझ्या जीवनात एवढी प्रेमाची माणसे असल्याबद्दल मला माझाच हेवा वाटू लागला.

लेखात उल्लेख केलेल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद!


13 Replies to “एक अनुभव….KOMTV चा!”

  1. खरेच तू multi-talented आहेस….. अशीच पुढे पण यशस्वी वाटचाल करीत रहा…..

  2. Great Savi.Mi tuzyasamor mhanoon sangat nahi,khoop goshti shiknyasarkhya aahet tuzyakadoon.Vividh topics var tuze lekhan,planning of works,patience and passion for every good thing.Magnetic personality u carry really.God bless.Wish you all the success and happiness in life.

  3. You explained the complicated topic in very easy language and shared a lot of important information. Thanks 👍

  4. Congratulations aunty.!! 💐
    Expecting & eagerly waiting for many more good articles from you… you r multitalented, genius 😎; there r many facets to your personality .. You r “Like a Diamond” . I’m continuously learning some or the other thing from you from my childhood.. you r my ideal.!! 😊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *