अरे बाबा कोरोना, आलास तसा जाशील ना?


आजकाल सगळीकडे एकच विषय..कोरोना..कोरोना आणि कोरोना! ज्याच्यामुळे सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

हा लेख इंग्लिश मध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

तर पाहू या हा कोरोना व्हायरस काय आहे ते. आपल्याला सूक्ष्म जंतूमुळे रोग होतात. सूक्ष्म जंतूचे महत्वाचे दोन प्रकार म्हणजे जिवाणू (बॅक्टेरिया) आणि विषाणू (व्हायरस). दोन्हीही साध्या डोळ्यांना दिसत नाहीत पण जिवाणू हे विषाणू पेक्षा मोठे असतात. विषाणूंना पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन सुक्षमदर्शक वापरावा लागतो आणि जिवाणू मात्र साध्या सुक्षमदर्शक यंत्राखाली दिसतात. जीवाणूंना मारण्यासाठी अँटिबायोटिक्स उपलब्ध आहेत पण तीन चार अपवाद वगळता विषाणूसाठी जगात औषध उपलब्ध नाही. प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर विषाणूवर मात करता येतो.

कोरोना व्हायरसचे बरेच प्रकार असतात. कोरोना विषाणूवर काटय़ांसारखी रचना असते. त्यामुळे त्यांना कोरोना म्हणतात. ते काटे पेशीत रुतले जातात व नंतर यजमान पेशीला चिकटून विषाणू शरीरात प्रवेश करतो. त्यातला हा नवीन प्रकार, कोरोना- SARS-CoV-2, चीन मधल्या वुहान शहरात डिसेम्बर २०१९ मध्ये सापडला. ह्या वायरसमुळे हा जो संसर्गजन्य रोग पसरला आहे तो आहे कोविड १९ ( COVID 19 ). त्याला कोविड १९ (COVID 19) असे का म्हणतात? इंग्लिश मधल्या त्याच्या नावाचे शॉर्ट फॉर्म आहे (CORONA VIRUS DISEASE- 2019) आणि पहिली केस डिसेम्बर २०१९ मध्ये आढळली म्हणून १९ असे नाव. या विषाणूची लागण प्राण्यांमार्फत माणसाला झाली असावी, अशी दाट शक्यता आहे. चीन मधून आता सगळ्या जगभरात पसरत आहे आणि एक दहशत निर्माण झाली आहे. हा एक झपाट्याने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्याला त्याचा संसर्ग होऊ शकतो. तसे पाहता ह्या रोगामुळे मरणाऱ्यांची संख्या इतर विषाणूच्या तुलनेत कमी आहे. पण आजारी पडण्याचे प्रमाण मात्र खूप आहे. त्याबद्दल लोकांना जास्त माहिती नाही. जेव्हा पहिल्यांदाच एखाद्या नवीन विषाणुचा फैलाव होतो तेव्हा तो कसा रोखायचा, त्यावर कोणते उपचार आहेत, हे सगळं जाणून घेण्यात बराच वेळ जात असतो. ह्याला पॅंडेमिक असे जाहीर केलेले आहे कारण ते आता जगात सगळीकडे पसरत आहे.

हा व्हायरस कसा पसरतो? संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकला आणि शिंकेतून दुसऱ्या व्यक्तीच्या नाक, डोळे किंवा तोंडातून प्रवेश करतो. स्पर्शातून आणि संसर्ग झालेल्या वस्तू, कपडे किंवा पृष्ठ भागावरून विषाणू संक्रमित होऊ शकतात. एकदा ते शरीरात गेल्यावर रोगाची लक्षणे दिसायला २-१४ दिवस लागतात. लक्षणे दिसण्या आधी सुद्धा ती व्यक्ती व्हायरस संक्रमित करत असते हि जरा चिंतेची बाब आहे. ते रोखण्यासाठी खाली नमूद केलेल्या गोष्टी केल्यास त्याचे प्रमाण थोडेफार कमी होण्याची शक्यता असते.

त्याची लक्षणे काय आहेत ते पाहू या. हा रोग खूप सौम्य असू शकतो तर कधी गंभीर रूप धारण करतो. ताप येणे, कोरडा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही सुरुवातीची लक्षणे असतात. नंतरची लक्षणे म्हणजे छातीत दुखणे, घसा दुखणे, सांधे दुखू लागणे, श्वास वर वर जाऊन ओठ निळसर होणे, ताप वाढत जाणे, पोट दुखणे, मळमळ होणे आणि संडास लागणे. तोंडाची चव जाणे आणि वासाची संवेदनशीलता नष्ट होणे ही सुद्धा लक्षणे असू शकतात. लहान मुलांना ताप येऊन आणि अंगावर रॅश येऊ शकते.

जवळ पास ८१% लोक सौम्य रोगानंतर दोन आठवड्यात पूर्ण बरे होतात. अश्या पूर्ण बऱ्या झालेल्या व्यक्ती रोगमुक्त होतात आणि त्यांच्याकडून संसर्ग होत नाही. अश्या बऱ्या झालेल्या लोकांचे रक्त घेऊन त्यातले अँटीबॉडी दुसऱ्या रुग्णांसाठी वापरण्याचा नवा ट्रायल न्यूयॉर्क मध्ये सुरु झाला आहे. कोरोनाचे इन्फेक्शन झालेल्या १४% लोकांना गंभीर आजार होतो आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागते आणि ५% लोकांना आय सी यू (ICU) मध्ये ठेवावे लागते. अति गंभीर आजार झालेल्यांना निमोनिया, सेप्टिक शॉक होऊन किडनी आणि हार्ट फेल होऊ शकते आणि मृत्यू येऊ शकतो. हा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. मुलांना, निरोगी तरुणांना आणि मध्यमवयीन लोकांना असा सौम्य आजार होतो. वयस्कर, म्हणजे साठीच्या वरचे, ज्यांना फुफ्फुसाचे आजार, मधुमेह (डायबेटीस), हार्ट प्रॉब्लेम किंवा इतर काही आजार आहेत, तसेच ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झालेली आहे अश्या लोकांना हा संसर्ग होण्याची रिस्क दुप्पट असते आणि त्याची तीव्रता पण जास्त असते.

सगळ्यांचे लक्ष किती लोकांचा ह्या रोगामुळे मृत्यू झाला ह्याकडे जास्त आहे पण त्यातले किती लोक बरे झाले ते पाहात नाहीयेत. एक उदाहरण पाहू या. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्सच्या रिसर्च सेंटरच्या आकडेवारी नुसार

https://www.arcgis.com/apps/opsdashboard/index.html#/bda7594740fd40299423467b48e9ecf6

आजच्या तारखेला (१४ मार्च, २०२०) जगभरात एकूण 196, 639 लोकांना हा आजार झाला आहे. त्यापैकी 7893 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 80, 840 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत.

अश्या साथीच्या रोगाचे ४ स्टेजेस असतात.

१ ली स्टेज – बाहेरून लागण होऊन केसेस येतात
२ री स्टेज – स्थानिक लागण सुरू होते
३ री स्टेज – कम्युनिटी (समाजात) लागण
४ थी स्टेज – संपूर्ण साथ

सगळ्यांनी योग्य ती काळजी घेतल्यास पुढच्या स्टेजला जाण्यापासून प्रतिबंध घालता येतो. ही राष्ट्रीय आपत्ती आहे. देशाच्या व तुमच्या भविष्याचा विषय आहे. ही सगळ्यांची जिम्मेदारी आहे. स्वतःची योग्य काळजी घेणे आणि बाहेर न फिरणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

  • साबणाने कमीतकमी २० सेंकंद हाथ स्वच्छ धुवावे.
  • जर साबण जवळ नसेल तर  ६०% अल्कोहोल असलेले हॅन्ड सॅनिटायझर वापरावे.
  • डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करायचे टाळावे.
  • आजारी लोकांच्या खूप जवळ जाऊ नये.
  • हस्तांदोलन करण्याचे टाळा. त्या ऐवजी नमस्ते करा.
  • तुम्ही आजारी असाल तर बाहेर जायचे टाळा. घरीच थांबा.
  • खोकताना आणि शिंकताना तोंडावर टिशू धारा आणि तो टिशू नंतर टाकून द्या.
  • वाईप्स ने सगळे पृष्ठभाग वारंवार पुसून घ्या.
  • गरम पाणी आणि गरम/ताजे पदार्थ घ्या.
  • बाहेर खाण्याचे टाळा.
  • गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा.
  • सोशल डिस्टंसिंग म्हणजे एकमेकांपासून 6 फूट/ 2 मीटर अंतर ठेवणे.
  • चिकन, अंडी किंवा कोणत्याही अन्नपदार्थातून संसर्ग होत नाही.
  • महामारीच्या सुरुवातीला फक्त कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीची सेवा करणार्यांना आणि ज्यांना संसर्ग झालेला आहे त्यांना मास्क वापरायला सांगितले होते. सगळ्यांना मास्क वापरणे गरजेचे नाही असे सांगण्यात आले होते. नंतर मात्र मास्क वापरणे सगळ्यांना सक्तीचे केले आहे.
  • 3 लेअर डिस्पोजेबल सर्जिकल मास्कने काम होऊ शकते. N-95 किंवा N-99 मास्क वापरायची गरज नाही. (जेव्हा तुम्ही कोरोना ची लागण झालेल्या रुग्णाची काळजी घेत असाल आणि तुम्ही हॉस्पिटल मध्ये अश्या रुणाच्या आसपास वावरत असाल तरच N 95 हा मास्क वापरावा.)

जर तुम्हाला वर नमूद केलेली लक्षणे झाली तर स्वतःची योग्य काळजी घ्या. भरपूर पाणी प्या. वारंवार स्वच्छ हात धुवा. घरीच अराम करा. जर लक्षणे वाढत गेली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार औषधे घ्या.

सगळ्यांना कोरोना टेस्टची गरज नाही. ज्यांना वर नमूद केलेली लक्षणे असतील आणि जे दुसऱ्या देशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले असतील त्यांना टेस्टची आवश्यकता आहे. ऍलर्जी, फ्लू किंवा सर्दीची लक्षणे आणि कोरोनाची लक्षणे यामध्ये कन्फयुज होण्याची शक्यता असते. तुमच्या लक्षणावरून तुमचे डॉक्टर ठरवतील कि तुमची केस “संशयित” आहे किंवा नाही. एकदा तुम्ही “संशयित” ह्या सदराखाली आलात कि टेस्ट रिझल्ट येईपर्यंत सेल्फ-क्वारंटाईन (self-quarantine) म्हणजे स्वतःला अलग ठेवायचे.

हा विषाणू कागद, त्वचा, कपडे इत्यादींवर ८-१० तास जिवंत राहू शकतो आणि इतर पृष्ठभागावर त्यापेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकतो.

काही लोकांचे म्हणणे आहे कि गरम वातावरणात हा विषाणू जगू शकत नाही. पण WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) ने त्याला पुष्टी दिलेली नाही. लसूण खाल्ल्याने, कापूर जाळल्याने किंवा गोमूत्र प्यायल्याने कोरोना व्हायरसचा प्रतिबंध होतो असा समज आहे पण त्याला शास्त्रोक्त पुरावा नाही.

व्हिटॅमिन सी असलेली फळे आणि भाज्यांचा वापर करून प्रतिकार शक्ती सक्षम ठेवता येते.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि कोरोनाला मेडिसिन्स आहेत का? हा व्हायरस नवीन असल्यामुळे त्यासाठी मेडिसिन तयार झालेले नाही पण काही मेडिसिन्सचे ट्रायल सुरु आहेत आणि हळू हळू असे दिसत आहे कि ते उपयोगी होत आहेत. त्यासाठी अँटी वायरल ड्रग, मलेरिया आणि HIV ड्रग्स वापरण्यात येत आहेत.

१. एकदम निरोगी व्यक्ती आणि सौम्य आजार असेल तर ती औषधे देत नाहीत. त्यांना सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे तापीचे, सर्दीचे, डोकेदुखीचे औषध पुरेसे आहे.
२. आजार सौम्य आहे पण त्या व्यक्तीला दुसरे हेल्थ प्रॉब्लेम असतील (हार्ट प्रॉब्लेम, डायबेटीस, लंग प्रॉब्लेम, बी पी चा त्रास आणि वय >६० च्या वर) तर त्यांना मलेरिया ड्रग, Hydroxychloroquine देत आहेत.
३. गंभीर आजार होऊन व्हेंटिलेटरवर असतील तर त्यांना अँटी वायरल ड्रग, मलेरिया ड्रग्स, फ्लू ड्रग्स, HIV ड्रग्स, अँटिबायोटिक किंवा काम्बिनेशन देत आहेत.

खालील मेडिसिन्स वापरत आहेत. नावे इंग्रजीत लिहीत आहे:

Hydroxychloroquine

         Azithromycin

Remdesivir

Lopinavir/ritonavir

Ribavirin

अश्या आणीबाणीच्या काळात सोशल मीडियावर अफवा पसरतात. चुकीची माहिती आणि अफवांमुळे लोकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होते. अश्या परिस्थितीत सगळ्यांचे कर्तव्य आहे कि ह्या व्हायरस बद्दल योग्य माहिती मिळवणे, समजून घेणे, रोग पसरू नये म्हणून शक्य असलेली सगळी काळजी घेणे, आपले आरोग्य सांभाळणे, प्रतिकारशक्ती उत्तम राखणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे. जेव्हा आपण अति चिंता करतो, पॅनिक होतो तेव्हा आपली रोग प्रतिकार शक्ती घटते. शरीराने आणि मनाने स्ट्रॉंग राहण्यासाठी खालील गोष्टी करता येतील:

प्राणायाम म्हणजे ब्रिथिंग एक्सरसाइज केल्याने फुफ्फुसे निरोगी राहतात आणि व्हायरसशी लढायला मदत मिळते. दीर्घ श्वास आत घ्यायचा आणि रोखून धरायचा. तसाच दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आणि रोखून धरायचा. सुरुवातीला कठीण जाईल पण सतत करत राहिल्याने ३० सेकंद ते २ मिनिटे पर्यंत श्वास रोखता येईल.

तसेच सोशल मीडियाचा अतिवापर करून सारखे कोरोना बद्दल वाचणे/ऐकणे/पहाणे केल्यामुळे डोक्यात सतत तेच विचार राहतात आणि नकळत आपली अंक्साइटी (anxiety) वाढते. ह्याचा फायदा कमी आणि तोटाच जास्त! काही लोक गैरफायदा घेऊन कोरोनाचे औषध म्हणून काहीही लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतात.

पुढील काही दिवसात रुग्णांची संख्या खूप वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांना शक्यतो घरीच राहायला सांगितलेले आहे. एरवी धावपळीच्या जीवनशैलीत आपल्याला घरच्यांसोबत वेळ घालवायला मिळत नाही. तक्रार किंवा भीती ऐवजी ह्या संधीचे सोने करून घ्या.

असे म्हणतात ना कि जे होतं ते चांगल्यासाठीच. असे समजू या कि आपली जीवनशैली सुधारण्याची, जास्त स्वच्छता आणि सफाई राखण्याची, चांगले आरोग्य कमावण्याची संधी घेऊन आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पाहायला शिकवण्यासाठीच हा कोरोना आला असावा!

टेक होम मेसेज:
हा झपाट्याने पसरणारा रोग आहे.
→ हे रोग कोणालाही होऊ शकतो.
→ पॉझिटिव्ह असलेले रुग्ण घरी क्वारंटाईन होतील किंवा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतील.
→ समाजाला जास्त धोका त्या लोकांकडून आहे जे इन्क्युबेशन पिरिअड मध्ये आहेत. ते ह्या भ्रमात आहेत कि ते हेल्दी आहेत आणि त्यांना कोरोनाचा धोका नाही किंवा सेफ आहेत. त्यांना रोग होईलही आणि ते बरे पण होतील. असे लोक इन्क्युबेशन पिरिअडमध्ये सोशल डिस्टंसिंग न पाळता वयोवृद्ध लोकांसाठी यमदूत बनू शकतात.

→ देशाच्या व तुमच्या भविष्याचा विषय आहे. ही सगळ्यांची जिम्मेदारी आहे.

→ स्वतःची योग्य काळजी घेणे आणि बाहेर न फिरणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

शेवटी एकच गोष्ट सांगावीशी वाटते: काळजी घ्या पण काळजी करू नका !!

References:

  1. https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/index.html
  2. http://www.uphs.upenn.edu/antibiotics/COVID19.html
  3. https://www.arcgis.com/apps/opsdashboard/index.html#/bda7594740fd40299423467b48e9ecf6
  4. Picture of foods containing vitamin C was taken from: style=”color: #0000ff;” href=”https://creativemarket.com/aiselin/2508509-Fruits-vegetables-rich-in-vitamin-C”>https://creativemarket.com/aiselin/2508509-Fruits-vegetables-rich-in-vitamin-C

50 Replies to “अरे बाबा कोरोना, आलास तसा जाशील ना?”

  1. Very very important and useful information you have given for general public n Medical fraternity. Thanks for writing. Really y are great. No word for admirable work, though you are so busy in your work. Thanks again and again.

  2. खूप छान लेख ।
    ह्याची copy मला व्हाट्स ऐप करा ।
    मी सगळीकडे फॉरवर्ड करेन ।
    हा खूप महत्वाचा लेख असून ह्यामुळे खूप सुरक्षितता वाटणे सुरू होईल ।
    9503500669

  3. Dr, Savitra,
    खूप छान लिखाण,
    अत्यंत सोप्या भाषेत क्लिष्ट विषय समजावला आहे,
    मराठी भाषिकांना सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे खूप फायदा होईल,
    अश्या उपयोगी लिखाणासाठी धन्यवाद

    1. Very nice written by dr Savita
      Rekhawar. Very easy to cognition. you have doing great work in society by awaring latest problem of common people.
      All d Best for your great job.

  4. डॉ. सावित्रा, सर्व प्रथम तुमचं हा लेख प्रसारीत केल्या बद्दल अभिनंदन. खूप सोप्या भाषेत आणि सर्वांना कळण्या सारखे सुरक्षा ऊपाय.

    श्रीकांत अटकळीकर
    9552533987
    7276467393

  5. Dr.savita khoop chaan lekh lihila aahes kharach tu khoop great aahes tu sangitala pramane aamhi nakich kalji gheu n geytoch aahot

  6. सावी अगदी सोप्या भाषेत छान समजावलेस.

  7. डॉ सावित्री
    आपण लिहिलेला लेख सध्याच्या वास्तवाशी महत्वपुर्ण आहे आपण जर व्हाट्सअप वर मला पाठवला तर नक्कीच अजून खूप जणांना वाचण्यात येऊन त्याचा फायदा होऊ शकेल ..
    आनंदीविकास

    1. धन्यवाद! तुमचा फोन नंबर नसल्यामुळे मी तुम्हाला व्हाट्स अँप वर पाठवू शकत नाही. ह्या लेखाच्या पहिल्या पिक्चर च्या वर फेसबुक, व्हाट्सअप किंवा ई-मेल करण्यासाठी ऑपशन आहे.
      तुम्ही खालील लिंक कॉपी/ पेस्ट करू शकता.
      https://drsavitra.com/%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%9c/

  8. कोरोना बद्ददल लोकात असलेले बरेच गैरसमज तुमचा लेख वाचुन दुर होतील अगदी सोप्या भाषेत आणी सहज पणे तुम्ही मुद्देसुद सवीस्तर लेखात माहीती दीली.अमेरीकेत राहुन सुध्दा आपली मातृभाषा तुम्ही वीसरला नाहीत याचे नवल वाटते.पण तुमच्या उच्चतम बुध्दीमत्तेचा उपयोग देगलुर वासीयांना होत नाही याची खंत वाटते.

    1. Khup chan mahiti dili aahe ya mahitimulye aadhar vatato aahe n aatmavishwas pan abhinandan Dr savitri👍👍👌👌

  9. डॉक्टर सविता रेखावार,
    आपण लिहिलेला लेख समाजातील भय कमी करणारा असून या लेखाच्या माध्यमातून आपण एक प्रकारचे अभय देऊन हिम्मत वाढवलेली आहे.
    याबद्दल आपले आभार.

  10. खुप छान माहिती
    या माहिती मुळे हा आजार कसा व कशी उपाय योजना करावी हे सोप्या भाषेत कळाले
    आम्ही भारतीय आपले आभारी आहोत

  11. Very nice interpretation about CORONA virus.It will definitely help to control &fear..
    Thanks a lot

  12. लेख वाचून मनातील सर्व शंका दूर झाल्या.सुंदर लेखन..

  13. या माहिती मुळे हा आजार कसा व कशी उपाय योजना करावी हे कळाल सुंदर माहिती

  14. Very nice update information provided by Dr Savitra .
    Thanks from so many readers who are living fearless from this message.

  15. अत्यंत माहितीपूर्ण लेख साध्या सोप्या सरळ भाषेत यातील सकारात्मक दृष्टिकोन खुप आवडला धन्यवाद

  16. डॉ. सावित्रीभंडारी, आपन कोरोना व्हायरस ची माहिती खुप छान पाठविली कारण माहिती वाचल्या नंतर कोरोना व्हायरस ची जी भिती होती ती पूर्णपणें मनातुन निघुन गेली. धन्यवाद

  17. खुप चांगला लेख आहे.
    हे लेख वाचल्यावर मनातील कोरोना विषयी भय व गैरसमज दूर होण्यास मदत आवश्य होईलच असे मला वाटते.

  18. प्रिय डाॅ. सावित्रा,,,खूप सुंदर व सोप्या भाषेत लेख लिहुन जागृृृृृृतिचे कार्य केले आहे.वास्र्तृृृृृृत अशी माहीती नक्कीच सर्वांना दिलासा देणारी आहे.आम्हाला तुझा अभिमान आहे.

  19. सोप्या भाषेत उपयुक्त माहिती बद्दल अभिनंदन

  20. Savitra tai khup chan margdarshan kelas aamha bhartiyana tyacha khup fayda hoil, Rani rajni ni tu Amerikela aahes he sangitale hote, purn Degloor wasi & Nanded jilhyala tuza abhiman aahe.mi pan Nedarlands la aahe Amstradam la adakley pan ghabrun chalnar nahi sampurn jag yacha samna kartoy aamhi pan kalji ghetoy pan tuza lekh wachun ajun dilasa milala purn Degloor wasiyan kadun Hats off Proud of you .

  21. खूपच सुंदर व शास्त्रीय माहिती अगदी सोप्या भाषेत सांगितली. हे फार अवघड असते ते तुम्ही केले.
    धन्यवाद.

  22. छान लिखाण,
    अत्यंत सोप्या भाषेत क्लिष्ट विषय समजावला आहे,
    मराठी भाषिकांना सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे खूप फायदा होईल,
    अश्या उपयोगी लिखाणासाठी धन्यवाद

  23. Hi, madam
    It’s a very nice information about
    Covid -19. & it’s helps to scaring people’s.

    Once again, very thankful to u ma’am.

  24. Nice information about corona disease in simple language .
    Very useful in the people

  25. Khup chan mahiti ahe ya mahiti mule yoge te kailji sagle jan ghetle ani konacha manat je shanka che charka chalu ahe tyla thoda viram pan basel thank you maushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *