हा लेख इंग्रजीत वाचण्यासाठी इथे क्लिक करा: A Life Changing Birthday!
मला अजूनही ही घटना अगदी स्पष्टपणे आठवते. मी अॅनेस्थेसिया प्रॅक्टिस करत होते आणि उर्वरित वेळेत जेनेरल प्रॅक्टिस करत होते. माझ्या घरी, देगलूर गावी, माझे एक लहान क्लिनिक होते, जे दिवसा सुरु असायचे आणि रात्री बंद असायचे.
एके रात्री 2 च्या सुमारास माझ्या क्लिनिकची बेल वाजली. मी थोड्या संभ्रमाने दार उघडले. पाहिले तर काय एक शेतकरी जोडपे आणि त्यांच्या हातात एक लहान मूल जे खूप आजारी वाटत होते. त्या जोडप्याने त्यांची कहाणी अश्रुपूर्ण नयनांनी कथन केली. हे कुटुंब जवळच्या छोट्याशा गावातले होते. त्यांच्या राणी नावाच्या मुलीला एका आठवड्यापूर्वी गॅस्ट्रोएन्टेरिटिस (अतिसार) सुरु झाला होता. सुरुवातीला जास्त गंभीर नसल्यामुळे त्यांनी वैद्यकीय मदत घेतली नाही. तीचा आजार वरचेवर बळावत जाऊ लागला. ती धड खात-पीत नव्हती आणि खेळत नव्हती. म्हणून त्यांनी तिला देगलूरला डॉक्टरकडे न्यायचे ठरवले. ते देगलूरला पोहोचले तेव्हा अंधार पडला होता. ते आपल्या आजारी मुलीला घेऊन सगळी इस्पितळे आणि बऱ्याच डॉक्टर्सकडे गेले, परंतु तिची गंभीर परिस्थिती पाहून कोणी तिची केस घ्यायला तयार नव्हते. त्या सर्वांनी तिला पुढील उपचारासाठी मोठ्या शहरात नेण्याचा सल्ला दिला. माझ्या शहरापासून सर्वात जवळचे मोठे शहर ८०किमी (५० मैलांवर) होते. तिथे पोहोचायला कमीत कमी २ तास लागले असते. राणीची प्रकृती अधिकच खालावत होती. ती मलूल होऊन प्रतिसाद द्यायचे बंद केले होते. तिचा श्वास वर वर जात होता.
मी बालरोगतज्ञ नव्हते आणि माझे क्लिनिक तिला उपचार देण्याइतके सुसज्ज नव्हते. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मोठ्या शहरात जायला वेळही नव्हता. जेव्हा मी तिची अवस्था आणि त्या जोडप्याची हतबलता पाहिली, मी मनोमन ठरवले कि काहीही होवो मी तिच्यावर उपचार करेन. त्यात खूप धोका हि होता. तिचा मृत्यूपण झाला असता आणि तसे झाले तर पालकांच्या संभाव्य प्रतिक्रियेबद्दलही कल्पना होती. मी देवाला प्रार्थना केली आणि तिला आत घेतले आणि उपचार सुरु केले. डिहायड्रेशन (शरीरातले पाणी खूप कमी झाल्यामुळे) नस मिळणे हि कठीण होते. पण माझ्या बधिरीकरण कौशल्यांचा उपयोग झाला आणि मला नस सापडली. माझ्याकडे लहान मुलांसाठी आवश्यक असलेले सलाईन नव्हते. माझ्या भावाचे औषधी दुकान होते. तो मला आवश्यक असलेले सलाईन आणि इतर औषधी आणायला गेला. तो येईपर्यंत थांबायला वेळ नसल्याने माझ्याकडे असलेले सलाईन सुरु केले. थोडे सलाईन शरीरात गेले आणि तिचे हात पाय वाकडे होऊ लागले. तिच्या शरीराला इलेक्ट्रोलाइटसची (कॅल्सिम, मॅग्नेशियम ), आणि ग्लुकोजची गरज होती. काय करावे सुचत नव्हते. माझ्याकडे ऍनेस्थेशिया किट होती. त्यातून सगळे इमारजन्सी इंजेकशन्स काढले. एक एक करून त्यातली काही औषधे तिच्या सलाईनमध्ये टाकले आणि हळू हळू तिची अवस्था सुधारत गेली. थोड्या वेळात माझा भाऊ सगळी औषधी आणि सलाईन घेऊन धावत धावत पोहोचला होता. मग उर्वरित उपचार सुरु झाले आणि अर्ध्या तासात तिच्या पांढऱ्या फटक पडलेल्या चेहऱ्यावर रंग चढू लागला. तीने हालचाल सुरु केली. तिच्या हृदयाचे ठोके सुधारू लागले. तिचे ब्लड प्रेशर नॉर्मल होऊ लागले. आम्ही सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. आता धोका टळला होता. राणी तिच्या आई-बाबांकडे पाहून हसत होती, बोबडे बोल बोलत होती. मला ते दृश्य पाहून खूप बरे वाटले. मग मी थोडी विश्रांती घ्यायला गेले.
काही तासांनंतर मी परत आले. ती आरामात अंथरुणावर झोपली होती. कोवळी सूर्य किरणे खिडकीतून तिच्या तोंडावर पडले होते आणि त्यात तिचा गोड़ चेहरा उजळून निघाला होता. तिच्या भोवती तिच्या कुटुंबाचे आणखी बरेच सदस्य तिला पाहण्यासाठी गावाहुन आले होते. माझे संपूर्ण क्लिनिक लोकांनी भरले होते! राणीचे आई बाबा आणि तिचे नातेवाईक माझी आतुरतेने वाट पाहत होते. त्या सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त करायची घाई झाली होती. मी राणीला तपासले. ती जागी झाली आणि आपल्या कुटूंबासमवेत हसू खेळू लागली. तिच्या आई-वडिलांनी तिला उचलले आणि चक्क माझ्या पायावर तिचे डोके ठेवले. त्यांनी मला सांगितले कि आज तिचा पहिला वाढदिवस होता. ते म्हणे, तुम्ही तिला जीवदान दिले. नाहीतर आज तिचे काहीही झाले असते. कदाचित ती वाचली नसती. ते ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काय बोलावे सुचत नव्हते. राणीला भरभरून आशीर्वाद दिला. तिच्या गोड़ चेहऱ्यावरून हात फिरवला.
दुपारनंतर तिला डिस्चार्ज दिला. राणीला आणि तिच्या कुटूंबाला निरोप देत होते आणि मनातल्या मनात देवाचे आभार मानत होते. या गोड़ मुलीला वाचवण्यासाठी मला आवश्यक धैर्य दिल्याबद्दल! डॉक्टर बनण्यासाठी पडलेले कष्ट फळाला आले होते. एका सामाजिक जबाबदारीची जाणीव जागृत झाली होती.
Very nicely written article Savi.
U r a Genius Savi.God bless You.Great Work.Some pure karmic account with Rani u really share.Totally unbelievable……
Thank you!
Interesting case Dr. Bandari. I am glad kid was revived with IVF
Thank you.
खूपच महान काम ग तुझे कसेही करून त्या लेकराला वाचवलीस savitra चांगल्या कामाला देवाची साथ असतेच ग तुला त्याचे पुण्य लागतेच तुझ्या रूपात त्यांना देवच भेटला खूपच गर्व आहे आम्हाला तुझा धन्यवाद ग तुझे बाळाला सोय नसताना ही रिस्क घेतलीस आणि वाचवलीस
Thank you, dear Sushama:)
Commendable… your sense of responsibility and empathy towards your patients made you successful practitioner. You hv always shown lots of courage in personal as well as professional life… can’t say definitely ; whether your confidence gives you courage or courage gives you confidence…may be both go hand in hand ..and you become more and more confident and courageous both. Proud of you aunty… lot to learn from you.
Thank you, dear Aarti. I agree with confidence and courage go hand in hand. Life puts us in such situations when you have not much choice than facing it with courage! Love you.